संतापजनक! 13 वर्षांच्या मुलीवर सामूहिक बलात्कार, नराधमांनी कापली जीभ आणि फोडले डोळे

संतापजनक! 13 वर्षांच्या मुलीवर सामूहिक बलात्कार, नराधमांनी कापली जीभ आणि फोडले डोळे

नराधमांनी अल्पवयीन मुलीचे डोळे फोडले आणि जीभही कापली कापल्याची माहिती समोर आली आहे.

  • Share this:

लखीमपूर, 16 ऑगस्ट : कोरोनाच्या काळात माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे. अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करून हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. उत्तर प्रदेशमधील लखीमपुर खेरी जिल्ह्यात ईशानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा भयंकर प्रकार घडला. शुक्रवारी पोलिसांना उसाचा शेतात 13 वर्षीय अल्पवयीन मुलीचा मृतदेह सापडला. पोलिसांनी तो शवविच्छेदनासाठी पाठवला आणि रिपोर्ट पाहून पाया खालची जमीनच सरकली.

मुलगी खूपवेळ घरी आली नाही म्हणून कुटुंबियांनी शोधाशोध केली त्यानंतर पोलिसात मुलगी घरी आली नसल्याची माहितीही दिली. उसाच्या मळ्यात 13 वर्षांची अल्पवयीन मुलीचा मृतदेह सापडला.

हे वाचा-पत्नी माहेरी गेली म्हणून आला राग, माजी सैनिकाने केला धक्कादायक प्रकार

काय आहे प्रकरण?

अल्पवयीन मुलगी शेतात शौचालयासाठी गेली होती. तिथून जाणाऱ्या गावातील दोन मुलांनी या मुलीवर बलात्कार करून तिची निर्घृण हत्या केली. बलात्कारानंतर या तरुणांनी तिचे हाल केल्याचं दिसत होतं. जीभ कापली होती आणि डोळे फोडले होते. गळ्यातील ओढणीनं तिला खेचल्याचे व्रणही मृतदेहावर उठल्याचं दिसत होतं. उसाच्या शेतात हा मृतदेह फेकून दोघंही तरुण फरार झाले.

शवविच्छेदन अहवालात सामूहिक बलात्कार आणि गळा दाबून हत्या केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या प्रकरणी पोलिसांनी पॉस्को आणि हत्येचा गुन्हा दाखल केला असून दोन संशयितांना अटक केली आहे.

Published by: Kranti Kanetkar
First published: August 16, 2020, 8:34 AM IST

ताज्या बातम्या