Home /News /crime /

कोरियाई बँडचे Video पाहायची लागली सवय; विद्यार्थिनीची अभ्यासाच्या खोलीतच आत्महत्या

कोरियाई बँडचे Video पाहायची लागली सवय; विद्यार्थिनीची अभ्यासाच्या खोलीतच आत्महत्या

विद्यार्थिनीच्या मृतदेहाशेजारी एक सुसाइड नोट सापडली असून त्यातून हा खुलासा झाला आहे.

    तिरुवनंतपूरम, 6 जून : Kerala Student Addicted Korean Band: केरळची (Keral News) राजधानी तिरुवनंतपुरममध्ये (Thiruvananthapuram) 16 वर्षीय एका विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. तिच्याकडे एक सुसाईड नोट सापडली असून ज्यात आत्महत्येच्या कारणाचा खुलासा करण्यात आला आहे. व्हिडीओचं लागलं होतं व्यसन... ही घटना कल्लम्बलम पोलीस ठाणे (kallambalam police station) हद्दीतील आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विद्यार्थिनीजवळ एक सुसाइड नोट सापडली आहे. त्यात दिल्यानुसार, तिला कोणी मित्र-मैत्रिणी नव्हते आणि तिला कोरियाई बँडच्या व्हिडीओचं व्यसन लागलं होतं. ज्यामुळे तिला परीक्षेत कमी मार्क मिळाले होते. आणि यातूनच तिने धक्कादायक पाऊल उचललं. (used to watch videos of Korean bands, Student commits suicide in study room) परीक्षेवर झाला परिणाम... विद्यार्थिनीच्या सुसाइट नोटनुसार, ती डिप्रेशनमध्ये होती. बँडच्या व्हिडीओच्या सवयीमुळे तिच्या अभ्यासावर परिणाम झाला होता. आणि तिला कोणी मित्र-मैत्रिणी नव्हत्या. अधिकारींनी सांगितलं की, विद्यार्थिनी 10 वीपर्यत शिक्षणात चांगली होती. दहावीनंतर ती आपल्या आईचा फोन वापरू लागली होती. यादरम्यान यूट्यूबवर तिला कोरियाई बँडची सवय लागली होती. मिळालेल्या माहितीनुसार, व्हिडीओच्या सवयीमुळे तिचं घराबाहेर जाणं कमी झालं होतं. यामुळे तिचा बाहेरच्या जगाशी संपर्क संपत जात होता आणि तिच्या अभ्यासावरही परिणाम झाला होता. या सर्व प्रकारामुळे विद्यार्थिनीने एका खोलीत गळफास लावून आत्महत्या केली. त्याच खोलीत ती दार बंद करून अभ्यास करीत असे.

    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Kerala, Student, Suicide

    पुढील बातम्या