मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

भयंकर! वडिलांनी नवजात मुलीला कडक्याच्या थंडीत सोडलं, डोक्यात गोळ्या घातल्या

भयंकर! वडिलांनी नवजात मुलीला कडक्याच्या थंडीत सोडलं, डोक्यात गोळ्या घातल्या

नातेसंबंध, भावना, माणुसकी, या सर्वांना हादरवून सोडणारी घटना अमेरिकेत (US) घडली आहे. येथील एका उलट्या काळजाच्या बापानं (Father) त्याच्या नवजात मुलीची (New born baby) हत्या केली आहे.

  • Published by:  News18 Desk

न्यूयॉर्क, 15 जानेवारी :  नातेसंबंध, भावना, माणुसकी, या सर्वांना हादरवून सोडणारी घटना अमेरिकेत (US) घडली आहे. येथील एका उलट्या काळजाच्या बापानं (Father) त्याच्या नवजात मुलीची (New born baby) हत्या केली आहे. सैतानालाही लाजवणाऱ्या या बापानं पहिल्यांदा मुलीला बर्फाच्छादित झाडाजवळ सोडलं होतं. त्यानंतरही मुलगी मरत नाही, हे पाहिल्यानंतर त्यानं तिच्यावर दोन गोळ्या झाडल्या.

बापही अल्पवयीन

या प्रकरणातला आरोपी बाप हा अल्पवयीन (Minor) आहे. तो 16 वर्षांचा आहे. मात्र, अमेरिकेतील कायद्यानुसार त्याच्यावर सज्ञान व्यक्तींसारखेच गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तो अल्पवयीन आहे, म्हणून त्याच्या नवजात मुलीच्या हत्या प्रकरणातून त्याला कोणतीही सूट मिळणार नाही.

मुलीला का मारलं?

आरोपीनं त्याच्या बायकोच्या मदतीनं मुलीला मारण्याचा निर्णय घेतला होता. ते दोघं मुलीचा सांभाळ करण्यास सक्षम नव्हते, म्हणून त्यांनी त्या बाळाला मारण्याचं ठरवलं. त्यांनी सुरुवातीला बाळाला कडाक्याच्या थंडीत बर्फाच्छादित झाडाच्या जवळ सोडलं.

या थंडीतही नवजात बाळाचा मृत्यू झाला नाही, हे पाहून त्यानं बाळाच्या डोक्यात दोन गोळ्या झाडल्या. त्यानंतर त्यानं मृतदेह लपवण्याचा प्रयत्न केला, पण तो प्रयत्न यशस्वी झाला नाही. पोलिसांना रविवारी रात्री या बाळाचा मृतदेह आणि दोन रिकामी काडतुसं सापडली. त्यानंतर त्यांनी केलेल्या तपासात तिच्या अल्पवयीन बापाला अटक करण्यात आली आहे.

5 जानेवारी रोजी झाला होता जन्म

मृत बाळाच्या आईनं 5 जानेवारीलाच या मुलीला एका बाथटबमध्ये जन्म दिला होता. त्यांची सुरुवातीला हे बाळ एखाद्या मित्राला दत्तक देण्याची योजना होती. ती योजना यशस्वी झाली नाही, म्हणून या जोडप्यानं नवजात मुलीची हत्या केली, अशी माहिती तेथील वृत्तपत्रांनी दिली आहे.

या प्रकरणात अटकेनंतर आरोपीनं वारंवार त्याची जबानी बदलली आहे. स्थानिक कोर्टानं त्याचा जामीन अर्ज फेटाळला असून या प्रकरणातील पुढील सुनावणी 20 जानेवारी रोजी होईल.

First published:

Tags: Crime, United States of America