"सुशांत करू शकतो तर मी का नाही", सुसाईड नोट लिहून विद्यार्थ्यानेही घेतला गळफास

सुशांत सिंह राजपूतसारख्या अभिनेत्याने आत्महत्या (sushant singh rajput suicide) केल्याची बातमी पाहिल्यानंतर या मुलानेही आत्महत्येसारखं (student suicide) टोकाचं पाऊल उचललं.

  • Share this:

बरेली, 16 जून : अभिनेता सुशांत सिंह राजपूतने (sushant singh rajput) आत्महत्या (suicide) का केली? हे अद्याप समजलं आहे, त्याचा तपास सुरू आहे. अशात आता उत्तर प्रदेशमध्ये (uttar pradesh) एका विद्यार्थ्याने आत्महत्या (student suicide) केली आहे. सुशांतच्या आत्महत्येची बातमी पाहिल्यानंतर या मुलानेही आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचललं. सुशांत सिंह आत्महत्या करू शकतो तर मी का नाही? असं म्हणत आत्महत्येपूर्वी चिठ्ठी लिहून त्याने गळफास घेतला आहे.

आज तकच्या वृत्तानुसार, बरेलीतील हा विद्यार्थी दहावीत शिकत होता. त्याच्या वडीलांचं मोबाइल रिपेअरचं दुकान आहे. तर त्याच्या आईचं आधीच निधन झालं आहे.  आपल्यामध्ये किन्नरसारखी लक्षणं आहेत, चेहराही मुलीसारखा आहे त्यामुळे सर्वजण माझी चेष्टा करतात, असं कारण त्याने सुसाईड नोटमध्ये लिहिलं आहे.

हे वाचा - सुशांत सिंह राजपूत आत्महत्येप्रकरणी यांचीही होणार पोलीस चौकशी

विद्यार्थ्याने सुसाईड नोटमध्ये म्हटलं, "माझा चेहरा मुलींसारखा आहे. लोकं माझी चेष्टा करतात, माझ्यावर हसतात आणि आता आता मलादेखील वाटू लागलं आहे की मी किन्नर आहे. जर मी आत्महत्या नाही केली तर मी माझ्या वडीलांच्या आयुष्यात ग्रहण बनेन. त्यामुळे मी मरणं गरजेचं आहे. आता आत्महत्येशिवाय दुसरा मार्ग नाही"

विद्यार्थ्याच्या छोट्या भावाने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, जेव्हा ते दोघं टीव्ही पाहत होते, तेव्हा सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येची बातमी त्यांनी पाहिली. त्यावेळी त्याने सुशांत सिंहप्रमाणे आपण दोघांनी गळफास घ्यायला हवा, असं म्हटलं होते. जर असे फिल्म स्टार आत्महत्या करू शकतात तर आपण का नाही?, असं तो म्हणाला होता.

हे वाचा - सुशांतने आत्महत्येपूर्वी ट्विटरवर दिले संकेत? व्हायरल होतायेत स्क्रिनशॉट

जे लोक त्याचा तिरस्कार करत होते त्यांनाही आपल्या अंत्यसंस्कारात बोलावावं, असंही तो या सुसाईड नोटमध्ये म्हणाला आहे. आपल्या आत्महत्येसाठी त्याने कुणालाही जबाबदार ठरवलं नाही आहे.

संकलन, संपादन - प्रिया लाड

First published: June 16, 2020, 10:33 PM IST

ताज्या बातम्या