मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /धक्कादायक! नवऱ्याची हत्या करुन महिलेनं घेतला मुलाच्या मृत्यूचा बदला!

धक्कादायक! नवऱ्याची हत्या करुन महिलेनं घेतला मुलाच्या मृत्यूचा बदला!

 दारुड्या नवऱ्यानं केलेल्या मारहाणीमध्ये मुलाचा मृत्यू झाल्यानं संतापलेल्या महिलेनं नवऱ्याची डोक्यात हातोडा घालून हत्या (Murder) केली आहे. आरोपी महिलेनं या हत्येनंतर मृतदेह 24 तास घरामध्ये लपवून ठेवला होता.

शामली (उत्तर प्रदेश), 21 जानेवारी :  दारुड्या नवऱ्यानं केलेल्या मारहाणीमध्ये मुलाचा मृत्यू झाल्यानं संतापलेल्या महिलेनं नवऱ्याची डोक्यात हातोडा घालून हत्या (Murder) केली आहे. आरोपी महिलेनं या हत्येनंतर मृतदेह 24 तास घरामध्ये लपवून ठेवला होता, अशी माहिती पोलिसांच्या तपासात समोर आली आहे.

काय आहे प्रकरण?

उत्तर प्रदेशच्या (Uttar Pradesh) शामलीमधील ही धक्कादायक घटना आहे. शामलीमध्ये 17 जानेवारी रोजी तेजपाल या व्यक्तीचा मृतदेह सापडला होता. त्याच्या शरिरावर मारहाणीच्या खुणा होत्या. या प्रकरणात तेजपालचा भाऊ संजयनं दिलेल्या फिर्यादीनंतर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरु केला.

तेजपाल दारुडा होता, तसंच त्यानं अनेकांकडून पैसे उधार घेतले होते, ही माहिती प्राथमिक तपासामध्ये समोर आली. त्याच्या हत्येची वेगवेगळी कारणं सांगितली जात होती. पोलिसांनी या सर्व कारणांचा तपास करत 48 तासांच्या आत तेजपालची बायको पिंकीला या प्रकरणात अटक केली. पिंकीकडून हातोडा, तसंच रक्तानं भरलेली चादर देखील जप्त केली.

मुलाच्या हत्येचा घेतला बदला

तेजपालचं 2000 साली पिंकीसोबत लग्न झालं होतं. तेजपालला पत्ते खेळणे आणि दारु पिण्याचा नाद होता, अशी माहिती पिंकीनं पोलिसांना जबानीत दिली आहे. दारु प्यायल्यानंतर तेजपाल मारहाण करत असे. काही महिन्यांपूर्वी तेजपालनं नशेत मुलाला देखील मारहाण केली होती. या मारहाणीत मुलाचा शरिरातील नाजूक भागांना दुखापत झाली. यामध्येच त्याचा मृत्यू झाला.

मुलाच्या मृत्यूनंतरच पिंकीनं या हत्येचा बदला घेण्याचा निश्चय केला होता. तेजपाल 16 जानेवारी रोजी रात्री दारुच्या नशेत घरी परतला तेव्हा पिंकीनं त्याची हत्या केली. त्यानंतर त्याचा मृतदेह 24 तास घरामध्येच लपवून ठेवला होता. दुसऱ्या दिवशी रात्री तिनं एकटीनंच  तो मृतदेह घराच्या जवळच्या जंगलात फेकून दिला, अशी माहिती पोलिसांच्या तपासात समोर आली आहे.

'कोणताही पश्चाचाताप नाही'

‘आपल्याला या कृतीचा कोणताही पश्चाताप नाही. आता माझ्या मुलाच्या आत्म्याला शांती मिळेल,’  असं पिंकीनं पोलिसांना दिलेल्या कबुलीजबाबात सांगितले आहे.

First published:
top videos

    Tags: Crime, Crime news, Uttar pardesh