रिअल लाईफचा बाजीगर, सुसाईड करण्याचा डाव रचून प्रेयसीचा केला मर्डर

रिअल लाईफचा बाजीगर, सुसाईड करण्याचा डाव रचून प्रेयसीचा केला मर्डर

प्रेयसीचं दुसऱ्यासोबत 10 तारखेला लग्न होणार होतंसप्तपदीच्या सात दिवसआधी प्रियकरानं हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

  • Share this:

मथूरा, 3 डिसेंबर : बाजीगर सिनेमात तुम्ही पाहिलं असेल की शाहरूख खान आणि शिल्पा शेट्टी सुसाईड करण्याचा प्लॅम करत असतात आणि त्या प्लॅनमध्ये शाहरूख खान त्याचे प्रेयसी शिल्पा शेट्टीची हत्या करतो. बाजीगर चित्रपटातील हा धक्कादायक सीन रिअल लाइफमध्ये देखील घडला आहे. प्रेमी युगुलानं आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला पण तरुणानं प्रेयसीची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) मधील मथुरा (Mathura) मध्ये एका तरुणाने त्याच्या प्रेयसीची गोळ्या झाडून खून केल्याने खळबळ उडाली आहे. सुखबीर असे या आरोपी तरुणाचे नाव असून त्याला पोलिसांनी (Police) अटक केली आहे. मृत तरुणीचे 10 डिसेंबर रोजी लग्न होणार होते. मथुरेतील गोपी कृष्णा गेस्ट हाऊसमध्ये ही घटना घडली. पोलिसांनी घटनास्थळावरुन पिस्तूल जप्त केले आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

काय आहे प्रकरण?

आरोपी आणि मृत तरुणी एकमेकांना गेल्या सहा वर्षांपासून ओळखत होते, अशी माहिती आता समोर आली आहे. त्या दोघांचे परस्परांमध्ये प्रमेसंबध होते आणि एकमेकांशी लग्न करण्याची इच्छा होती. मात्र ते एकमेकांचे नातेवाईक असल्याने त्यांचे लग्न शक्य नव्हते. त्यातच तरुणीचे लग्न ठरल्याने दोघांनी निराश होऊन आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी त्या दोघांनी मथुरेतील गेस्ट हाऊसमध्ये एकत्र रूम घेतली. त्याच रुममध्ये आरोपीने त्याच्या प्रेयसीची गोळ्या झाडून हत्या केली आहे.

हे वाचा-एका सिमकार्डसाठी तोडलं सात जन्माचं नातं, 23 वर्षीय तरुणीनं उचललं धक्कादायक पाऊल

आरोपी सुखबीरने आत्महत्येच्या नियोजनानुसार सोबत एक पिस्तूल आणि सहा काडतुसंही सोबत आणली होती. ते दोघं एकमेंकांना गोळी मारुन आपलं आयुष्य संपवणार होते. सुखबीरने सुरुवातीला तरुणीवर गोळी झाडली. त्यामध्ये तिचा जागीच मृत्यू झाला. तरुणीचे प्रेत पाहून घाबरलेल्या सुखबीरने आत्महत्येचा विचार बदलला आणि या प्रकरणाची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळावरुन पिस्तूल जप्त केले आणि तरुणीचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवला आहे.

Published by: News18 Desk
First published: December 3, 2020, 11:07 AM IST

ताज्या बातम्या