बाराबंकी (उत्तर प्रदेश), 27 जानेवारी: नातेसंबंधांना काळिमा फासणारा एक धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. मानसिकरित्या अस्थीर असलेल्या एका तरुणीची तिचे आई-वडील आणि भावानं मिळून हत्या (Murder) केली आहे. या हत्येमध्ये आईनं तिचे पाय बांधले होते. भावानं गळा दाबला. तर, वडील रस्त्यावर उभं राहून पाळत ठेवत होते. संपूर्ण परिवारानं अत्यंत हुशारीनं या तरुणीची हत्या केली होती. पोलिसांनी अखेर तिन्ही आरोपींना अटक केली आहे.
काय आहे प्रकरण?
उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) बाराबंकी (Barabanki) मधील हा सर्व धक्कादायक प्रकार आहे. या प्रकरणात मिळालेल्या माहितीनुसार 16 जानेवारी रोजी रात्री या तरुणीची हत्या करण्यात आली. या हत्येमध्ये सहभागी असलेले तिचे वडील मंशाराम, आई मीना कुमारी आणि भाऊ हरिओमला अटक करण्यात आली आहे.
कुटुंबीयांनी रचला बनाव!
हत्या करण्यात आलेल्या अल्पवयीन तरुणीचा मृतदेह 17 जानेवारी रोजी संध्याकाळी तिच्या घराजवळच्या शेतामध्ये नग्न अवस्थेत सापडला होता. या तरुणीच्या गुप्तांगाच्या जवळ जखमांच्या खुणा होत्या. मृत तरुणीच्या वडिलांनी या प्रकरणात मुलीवर अत्याचार करुन खून केल्याची तक्रार दाखल केली होती.
(हे वाचा-धक्कादायक! प्रेमाचं रहस्य लपवण्यासाठी मुलीनं प्रियकरासोबत उचललं हे भयानक पाऊल)
या प्रकरणात घटनास्थळी सापडलेली चप्पल पीडित तरुणीची नसल्याचं पोलिसांच्या लक्षात आलं. त्याचबरोबर पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये तिच्यावर कोणतेही अत्याचार झाले नसल्याचं स्पष्ट झालं. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास केला, तेंव्हा सत्य समोर आलं.
...म्हणून केली हत्या
मृत तरुणी मानसिकरित्या अस्थीर होती. त्यामुळे या कुटुंबीयांना समाजात वावरताना लाज वाट होती. तिचा भाऊ या हत्येची योजना तीन महिन्यांपासून करत होता. मात्र तिचे आई-बाप यासाठी तयार नव्हते. अखेर एकुलत्या एक मुलाच्या जिद्दीपुढं आई – वडिलांनी गुडघे टेकले आणि त्याच्या योजनेला मान्यता दिली.
(हे वाचा-छळाला कंटाळून सुनेनं केली सासूची हत्या; मृतदेहाचे डोळे काढले, बोटं कापली आणि...)
त्याचबरोबर अनुसुचित जाती जमातीच्या तरुणीवर अत्याचार करुन हत्या झाल्यास तिच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत मिळते. या मदतीच्या लालसेपोटी कुटुंबीयांनी तिच्या गुप्तांगाजवळ जखमा करत अत्याचाराचा बनाव रचला.