Home /News /crime /

घृणास्पद! हुंड्यासाठी किळसवाणा प्रकार, पतीनेच पत्नीचा अश्लील व्हिडीओ बनवून केला VIRAL

घृणास्पद! हुंड्यासाठी किळसवाणा प्रकार, पतीनेच पत्नीचा अश्लील व्हिडीओ बनवून केला VIRAL

हुंडा न दिल्यामुळे सासरच्या माणसांनी एखाद्या महिलेबरोबर चुकीची वागणूक केल्याच्या घटना वारंवार समोर येत असतात. मात्र मनासारखा हुंडा न दिल्यामुळे पतीनेच पत्नीबरोबर अत्यंत घृणास्पद वागणूक केल्याची घटना ऐकून तुम्हालाही चीड येईल.

    आझमगड, 1 मार्च : हुंडा न दिल्यामुळे सासरच्या माणसांनी एखाद्या महिलेबरोबर चुकीची वागणूक केल्याच्या घटना वारंवार समोर येत असतात. मात्र मनासारखा हुंडा न दिल्यामुळे पतीनेच पत्नीबरोबर अत्यंत घृणास्पद वागणूक केल्याची घटना ऐकून तुम्हालाही चीड येईल. या नराधमाने स्वत:च्या पत्नीचा अश्लील व्हिडीओ बनवून सोशल मीडियावर तो व्हायरल केला आहे. उत्तर प्रदेशातील आझमगडमधून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. स्वत: नवऱ्याने त्याच्या पत्नीसोबत गैरवर्तणूक केली आहे.  अपेक्षित हुंडा न मिळाल्यामुळे या नराधमाने स्वत: च्या पत्नीचा अश्लील व्हिडीओ बनविला आणि तो व्हिडीओ व्हायरल केला. पत्नीने आरोपी पतीविरोधात पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे. तिने असा आरोप केला आहे की पतीने तिला घरातून हाकलून लावले आहे. या घटनेबाबत गुन्हा दाखल करून पोलीस अधिक तपास करत आहेत. (हे वाचा- जन्मदात्या आईनेच पोटच्या चिमुरड्याला बुडवलं पाण्याच्या टाकीत, नंतर रचलं कुभांड!) आझमगड जिल्ह्यातील महाराजगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या या महिलेने शनिवारी गुन्हा दाखल केला. हुंडा तसंच छळ करण्यासह इतर कलमांमध्ये या नराधम पतीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी जौनपूर जिल्ह्यातील सराईख्वाजा परिसरात राहतो. त्याच्यासह कुटुंबातील पाच जणांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पती आणि त्याच्या कुटुंबाकडून हुंड्यासाठी पाच लाख रुपयांची मागणी केली जात होती.  पैसे न मिळाल्याने तिच्या नवऱ्याने या महिलेचा अश्लील व्हिडिओ बनवून व्हायरल केला.एवढे करून तो थांबला नाही तर या महिलेला जीवे मारण्याची धमकी देत तिला घराबाहेर हाकललं. अशा घटना वारंवार घडत असल्यामुळे स्त्री सबलीकरण तर सोडाच स्त्रियांना जगणं मुश्किल झालं आहे.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    पुढील बातम्या