लखनऊ, 25 डिसेंबर : उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh News) झासी येथे 72 वर्षांच्या एका निवृत्त हेल्थ ऑफिसरने आपल्या मैत्रिणीची हत्या (Killed Girlfriend) करून तिचा मृतदेह हायवेवर फेकून दिल्याची धक्कादायक घडना समोर आली आहे. हत्या केल्यानंतरही 5 वेळा तो मृतदेह पाहायला गेला. निवृत्त अधिकाऱ्याच्या पत्नीच्या मृत्यूनंतर तो घराजवळ राहणाऱ्या महिलेसोबत प्रेमसंबंध होते. महिलेने नशेत असताना दोघांमधील असलेले संबंध सर्वांना सांगण्याची धमकी दिली. त्यानंतर बदनामीच्या भीतीने त्याने महिलेची हत्या केली. या व्यक्तीने अत्यंत प्लान करून तिची हत्या केली, मात्र सरसोच्या पानांमुळे त्याचं गूढ उघड झालं.
झांसीचे CO डॉ. प्रदीप कुमार यांनी सांगितलं की, आरोपी निवृत्त अधिकारी भागवत प्रसाद (72) आणि त्याचा नोकर परशुराम (47) यांच्या चौकशीनंतर नेमका प्रकार समोर आला. ही हत्या 19 डिसेंबर रोजी घडली होती. दिवसा आरोपीने शेताजवळ तयार केलेल्या खोलीत हत्या केली. मात्र मृतदेहाची विल्हेवाट लावू शकला नाही. हत्येनंतर तो घाबरलाही नाही, मात्र अंधार होण्याची वाट पाहत होता. यादरम्यान त्याने आपल्या नोकराला मृतदेह ठिकाण्यावर लावण्यासाठी तयार केलं.
दोन दिवसात 5 वेळा मृतदेह पाहण्यासाठी गेला..
भागवत आणि त्याचा नोकर रात्री उशिरा कारमधून मृतदेह कानपूर हायवेवर घेऊन गेला आणि तिला सर्विस रोडवर फेकून दिलं. यानंतर आरोपी घरी आले. भागवत दोन दिवसात 5 वेळा मृतदेह पाहण्यासाठी त्या जागी गेले. जेव्हा 21 डिसेंबर रोजी पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला. यानंतर आरोपीलाही याबद्दल कळालं. मात्र आरोपीची हुशारी कामी आली नाही आणि 23 डिसेंबर रोजी पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं.
पोलिसांना जेव्हा महिलेचा मृतदेह दिसला तेव्हा तिच्याजवळ तार आणि सरसोंची पानं होती. जेव्हा पोलीस भागवतच्या घरी पोहोचली तेव्हा त्या पद्धतीची तार दिसली. मात्र दोघांनीही हत्येस नकार दिला. जेव्हा पोलिसांनी जवळपासचे CCTV कॅमेरे तपासले त्यावेळी दोघे रात्री उशिरा घरातून बाहेर जात असल्याचे दिसले. कारच्या सीटवर रक्ताचे डाग आणि सरसोची पानंही दिसली. यानंतर पोलिसांचा संशय दाट झाला. पोलिसी खाक्या दाखविल्यानंतर आरोपींनी गुन्हा कबुल केला.
हे ही वाचा-Dating वर जाण्यापूर्वी नाव केलं Google, सत्य वाचून सरकली पायाखालची जमीन
महिला पतीपासून वेगळी राहत होती...
मृत महिलेचे नाव सावित्री आहे. ती आपल्या पती व मुलांपासून वेगळी राहत होती. गेल्या 10 वर्षांपासून ती भागवतच्या घराजवळ राहत होती. भागवतच्या पत्नीचं 11 वर्षांपूर्वी निधन झालं होतं. यानंतर भागवत आणि महिला जवळ आले आणि दोघांमध्ये प्रेम प्रकरण सुरू होतं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime, Murder, Uttar pradesh