धक्कादायक! प्रियकराने तरुणीची हत्या करून तिच्यात शेतात गाडलं, 18 महिन्यांनंतर सापडला फक्त सांगाडा

धक्कादायक! प्रियकराने तरुणीची हत्या करून तिच्यात शेतात गाडलं, 18 महिन्यांनंतर सापडला फक्त सांगाडा

प्रेमानेच केला घात! 18 महिन्यांआधी घरून पळून गेली; कुटुंबियांना त्यांच्याच शेतात सापडला लेकीचा सांगाडा

  • Share this:

उन्नाव, 24 ऑक्टोबर : उत्तर प्रदेशच्या उन्नावमध्ये 18 महिन्यांनंतर कुटुंबियांना लेकीचा मृतदेह सापडला. ज्या मुलीनं प्रेमासाठी घर सोडलं तोच प्रियकर तिच्या जिवावर उठला. प्रियकरानं प्रेयसीची हत्या करून मृतदेह पुरल्याची घटना उन्नावमध्ये घडली. प्रेयसी लग्नासाठी दबाव आणत असल्यामुळे आरोपीनं तिची हत्या केली. आरोपीनं आपल्या जबाबात पोलिसांना ही माहिती दिली,

दीड वर्षांपूर्वी आरोपीसोबत मुलगी पळून गेली होती. तेव्हा पासून अजगैन आणि माखी पोलीस मुलीचा शोध घेत होते. सूरज असे आरोपीचे नाव आहे. यानंतरही पोलिसांना यश आले नाही. चौकशीदरम्यान पोलिसांना एक सांगाजा सापडला, पोस्टमार्टम केल्यानंतर हा मृतदेह त्याच मुलीचा असल्याचे सिद्ध झाले. पोलिसांना सापळा रचून आरोपीलाही अटक केली. सध्या त्याची चौकशी सुरू आहे. या प्रकरणात इतर सहभागी झालेल्या लोकांचीही पोलीस चौकशी करत आहेत. त्याचवेळी सूरजची मदत करणारा अनिल मिश्रा यालाही पोलिसांनी अटक केली आहे.

वाचा-उस्मानाबाद: महाराष्ट्रात खळबळ उडवून देणारं नरबळी प्रकरण, 6 आरोपींना जन्मठेप

मिळालेल्या माहितीनुसार, हे प्रकरण उन्नावच्या अजगान कोतवाली अंतर्गत असलेल्या नवाबगंज शहराचे आहे. मोहल्ला झाकरी येथील रहिवासी असलेली 26 वर्षीय शालू 2 एप्रिल 2019 रोजी अचानक बेपत्ता झाली. मृताची आई राणी हिने अजगैन कोतवाली येथील माखी पोलीस स्टेशन परिसरातील रहिवासी सूरजवर मुलीच्या अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता. त्याचवेळी माखी व अजगैन कोतवाली पोलिसांना मुलीला शोधण्यात अपयशी ठरले. काही दिवसांपूर्वी जेव्हा हे प्रकरण स्वॉट टीमच्या ताब्यात देण्यात आले होते, तेव्हा स्वॉट टीमने अजगैन पोलिसांकडे चौकशी सुरू केली.

वाचा-विरारमध्ये भररस्त्यात महिलेचा राडा; रिक्षाचालकावर चाकूने हल्ला केल्याचा VIDEO

आरोपीनं केला गुन्हा कबूल

पोलिसांनी आरोपी सूरजला तीन दिवसांपूर्वी कानपूर येथून ताब्यात घेतले आणि चौकशी केली असता सत्य सांगितले. आरोपीच्या सांगण्यावरून पोलिसांनी दफन केलेला मृतदेह बाहेर काझला. सुरजनं मित्र अनिल मिश्रासोबत शेतात माखी पोलीस स्टेशनपासून अवघ्या 8 किमी अंतरावर मृतदेह दफन करण्यात आला. मृताच्या वडिलांनी सांगितले की मुलीचा विवाह सूरजबरोबर झाला होता. लग्नाच्या वेळी सूरजच्या कुटुंबीयांनी गाडीची मागणी केली आणि ती ती पूर्ण करण्यासाठी पैसे नसल्यामुळे गाडी दिली नाही. त्यानंतर मुलगी बेपत्ता झाली. दरम्यान पोलीस कसून तपास करत आहेत.

Published by: Priyanka Gawde
First published: October 24, 2020, 10:10 AM IST
Tags: crime news

ताज्या बातम्या