भाजपच्या प्रदेश प्रवक्त्यावर जीवघेणा हल्ला; भरदिवसा मारेकऱ्यांनी घातल्या गोळ्या

भाजपच्या प्रदेश प्रवक्त्यावर जीवघेणा हल्ला; भरदिवसा मारेकऱ्यांनी घातल्या गोळ्या

भारतीय जनता पक्षाच्या (BJP) एका बड्या नेत्यावर (Leader) जीवघेणा हल्ला (attack) झाला आहे. ही घटना मुंगेरच्या इव्हनिंग कॉलेजजवळ घडली आहे.

  • Share this:

मुंगेर, 27 जानेवारी: शेतकरी आंदोलनामुळे कालपासून देश पेटलेला असताना, अशातच भारतीय जनता पक्षाच्या (BJP) एका बड्या नेत्यावर (Leader) जीवघेणा हल्ला झाला आहे. ही घटना मुंगेरच्या (Munger) इव्हनिंग कॉलेजजवळ (Evening College) घडली आहे. मारेकऱ्यांनी भाजपचा अल्पसंख्याकाचा चेहरा आणि प्रदेश प्रवक्ता (Spoke person) असणाऱ्या अजफर शमशी (Afjar Shamshi) यांच्यावर जीवघेणा हल्ला (Attack) केला आहे. या हल्ल्यात अजफर शमशी गंभीर जखमी (Injury) झाले असून त्यांना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

अजफर शमशी हे बिहार भाजपाचे प्रदेश प्रवक्ते आहेत. त्याचबरोबर ते एका कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणूनही कार्यरत आहेत. यावेळी ते आपल्या कारमधून उतरून कॉलेजला जात होते. त्याचवेळी त्यांच्यावर हा जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. यावेळी आलेल्या हल्लेखोरांनी त्यांच्या दिशेने दोन गोळ्या झाडल्या आहेत. यातील एक गोळी अजफर यांच्या मांडीला लागली असून या हल्ल्यात अजफर गंभीर जखमी झाले आहेत

(हे वाचा-कर्नाटक व्याप्त भूभाग ताबडतोब केंद्रशासित करा, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची मागणी)

अजफर शमशी यांना आता पाटणा येथील रुग्णालयात हलवलं आहे. या प्रकरणात आता पोलिसांनी जमालपूर कॉलेजचे प्रभारी प्राचार्य ललन प्रसाद सिंह यांना अटक केली आहे. असं म्हटलं जात आहे की, दोनच दिवसांपूर्वी ललन प्रसाद यांनी महाविद्यालयाचा प्राचार्य म्हणून पदभार स्विकारल्यानतर अजफर शमशी यांच्याशी वाद झाला होता. या वादातूनच शमशी यांच्यावर जीवघेणा हल्ला झाल्याचा संशय पोलिसांना आहे. असं असलं तरी पोलीस सध्या या प्रकरणाचा विविध अंगानी तपास करत आहेत. याप्रकरणी पुरावे गोळा करण्यासाठी पोलीस कसून चौकशी करत आहेत. तसेच आसपास असलेल्या सीसीटीव्ही फुटेजच्या साह्याने आरोपींना शोधण्यात प्रयत्न पोलीस करत आहेत.

(हे वाचा-अखेर हसीना बेगम भारतात परतल्या..! पाकिस्तानात भोगावा लागला 18 वर्षांचा तुरुंगवास)

या दुर्दैवी घटनेनंतर बिहार भाजप प्रदेशाध्यक्ष संजय जयसवाल या घटनेचा तीव्र निषेध केला असून घटना अत्यंत खेदजनक असल्याचं मत व्यक्त केलं आहे. याप्रकरणी मी डीजीपींशी बोललो असून पुढील कारवाई केली जात आहे. तसेच अफसर शमशी सुरक्षित आहेत, असंही ते यावेळी म्हणाले.

Published by: News18 Desk
First published: January 27, 2021, 3:00 PM IST
Tags: biharBJP

ताज्या बातम्या