मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

पुणे हादरलं! भरदिवसा व्यावसायिक चाकूने वार करत हत्या, कारण अस्पष्ट

पुणे हादरलं! भरदिवसा व्यावसायिक चाकूने वार करत हत्या, कारण अस्पष्ट

प्रतिकात्मक फोटो

प्रतिकात्मक फोटो

मृत पुजा प्रसाद हिचे कुटूंब मागील 20 ते 25 वर्षांपासून भोसरी परिसरात राहत आहे. तसेच पुजा हिचे ‘प्रगती कलेक्शन’ नावाचे दुकान आहे.

    पिंपरी, 16 ऑगस्ट : पुण्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असल्याचे समोर येत आहे. आज भरदिवसा चिंचवडमध्ये एका महिला व्यावसायिकेचा हत्या करण्यात आली आहे. ही धक्कादायक घटना आज सकाळी दहाच्या सुमारास भोसरी परिसरात घडली. पूजा देवी प्रसाद (वय-32) असे हत्या झालेल्या महिला व्यवसायिकेचे नाव आहे. गळ्यावर वार करत भरदिवसा तिची हत्या करण्यात आली. काय आहे संपूर्ण घटना - पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत पुजा प्रसाद हिचे कुटूंब मागील 20 ते 25 वर्षांपासून भोसरी परिसरात राहत आहे. तसेच पुजा हिचे ‘प्रगती कलेक्शन’ नावाचे दुकान आहे. तिथे आज सकाळी तिची हत्या करण्यात आली. आज सकाळी पूजाने साडेनऊच्या सुमारास दुकान उघडले होते. यानंतर तिने दुकानातील साफसफाई केली. मात्र, काही वेळातच दहा वाजेच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने तिच्या दुकानात प्रवेश केला. यानंतर पूजाच्या गळ्यावर चाकूने वार केले. हल्ला केल्यावर यावेळी त्यांच्यात झटापटही झाली. पूजाने हल्ला केलेल्या व्यक्तीला पकडण्याचा प्रयत्नही केला. इतकेच नव्हे तर दुकानाबाहेर जात त्याचा पाठलागही केला. मात्र, आरोपीने चाकूने केलेल्या हल्ल्यामुळे मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव झाल्याने पूजा दुकानाबाहेर कोसळली. यानंतर रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या पुजाला प्रसादला रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, खूप मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला होता आणि तोपर्यंत उशीर झाला होता. यामुळे तिचा मृत्यू झाला. हेही वाचा -  Bitcoin मध्ये गुंतवणुकीचे आमिष दाखवून 14 लाखांचा गंडा, पिंपरी-चिंचवडमधील घटना या हत्येचे कारण अजून समोर आलेले नाही. याप्रकरणी भोसरी पोलीस तपास करत आहे. अद्याप आरोपीला अटक झाली नसून पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. तर भरदिवसा झालेल्या या हत्येनंतर स्थानिक पोलीस प्रशासनावर प्रश्न उपस्थित केला जात आहे. तसेच पोलिसांचा गुन्हेगारांवर जरब राहिलेला नाही का, अशी प्रतिक्रियाही व्यक्त केल्या जात आहेत.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Murder news, Police, Pune, Pune crime news

    पुढील बातम्या