जयपूर, 29 जानेवारी : राजस्थानमधील (Rajasthan News) अलवरमध्ये पोलिसांनी तीन तरुणांना ताब्यात घेतलं आहे. हे तिघे कारमध्ये विद्यापीठ चालवत होते. पैसे देताच लागलीच पदवीपासून ते MCA, DED, पॉलिटेक्निक आणि लाइब्रेरियनपर्यंतची डिग्री- डिप्लोमा देत होते. अलवर एनइबी पोलिसांनी शनिवारी सुधीर कुमार यादव, सुजीत कुमार, सचिन कुमार यांना अटक केली आहे. तरुणांनी आतापर्यंत किती जणांना डिग्री दिली आणि त्यांच्याकडून किती पैसे घेतले याबाबतचा तपास सुरू आहे. देशातील अनेक विद्यापीठांशी साखळी जोडलेली.. तरुणांकडून जप्त केलेल्या एडमिशन फॉर्मबरोबर उत्तर पत्रिका, डिग्री, डिप्लोमासह अधिकाऱ्यांची स्वाक्षरी असलेले स्टॅम्प मिळाले आहेत. डायरींमध्ये पैसे घेऊन डिग्री वाटण्याच्या हिशोबाचाही उल्लेख आहे. तरुणांनी सांगितलं की, ते अलवरसह प्रदेश आणि देशातील अनेक प्रायव्हेट विद्यापीठाशी संलग्न आहे. हे ही वाचा-बंद खोलीचं गूढ उघड; भय्यू महाराजांचे 12 तरुणींसोबत होते संबंध, यापैकी दोघी IAS पैसे देताच उत्तर पत्रिका भरून देत.. तरुणांनी सांगितलं की, ते BSC, BBA, BCOM, PGDCA, MCA, DED, पॉलिटेक्निक आणि लायब्रेरियन सह अनेक प्रकारच्या डिग्री व डिप्लोमा देतात. पैसे घेतल्यानंतर लगेचच उत्तर पत्रिका भरून देत होते. त्यानंतर हा रेकॉर्ड विद्यापीठात जमा करतात. जेणेकरून सर्व रेकॉर्ड एकसारखे वाटतील. याचा अर्थ तरुण आणि खासगी विद्यापीठांसोबत देवाणघेवाण आहे. खुलाशानंतर पोलिसांनी विद्यापीठाचे नाव अद्याप जाहीर केले नाही. केवळ चुरू विद्यापीठाचं नाव सांगण्यात आलं आहे. याशिवाय अलवरसह अन्य विद्यापीठाचं नाव सांगण्यात आलेलं नाही.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime news, Education