मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /..अन् तो लेकींसमोर पत्नीला काठीने मारत राहिला; महिलेने जागेवरच सोडला जीव

..अन् तो लेकींसमोर पत्नीला काठीने मारत राहिला; महिलेने जागेवरच सोडला जीव

प्रातिनिधिक फोटो

प्रातिनिधिक फोटो

बापाने आपल्या आईची हत्या केल्याचं ती आपल्या डोळ्यांनी पाहत होती.

पाटना, 25 एप्रिल : बिहारमधील (Bihar News) रामपूर गावात रविवारी रात्री उशिरा दारूड्या पतीने काठीने मारून मारून हत्या केली. तरुणाच्या चार वर्षांच्या मुलीने संपूर्ण घटनाक्रम सांगिला. मृत महिलेचं नाव प्रियंका देवी (22 वर्षे) असल्याचं समोर आलं आहे. सूचना मिळाल्यानंतर सोमवारी सकाळी पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि मृतदेह पोस्टमार्टमसाठी रुग्णालयात पाठवण्यात आला.

प्रियंकाच्या पैशांनी दारूचं व्यसन...

गावकऱ्यांनी सांगितलं की, कौशल यादव बेरोजगार होता. तो पत्नी प्रियंकाच्या पैशांनी दारू पित होता. महिला आपल्या माहेराहून पैसे आणून घरखर्च चालवित होती. दोघांना दोन मुली आहेत. मुलगा नसल्याने कौशल पत्नीचा छळ करीत होता.

रविवारी रात्री कौशल यादव दारूच्या नशेत घरी पोहोचला आणि पत्नीला मारहाण करू लागला. कौशल्याच्या पत्नीच्या भावाचं लग्न होतं आणि तो सासरच्यांकडून मोठ्या रकमेची मागणी करीत होता. कौशल लग्नानंतर पत्नीला पैशांसाठी मारहाण करीत होता. आणि माहेरातून पैसे आणण्याची जबरदस्ती करीत होता. रविवारी रात्रीही त्याने पत्नीला मारहाण केली. ज्यात प्रियंकाचा मृत्यू झाला. यानंतर प्रियंकाच्या कुटुंबीयांना फोन करून याबाबत माहिती देण्यात आली. मृत महिलेचे कुटुंबीय जेव्हा घरी पोहोचले तेव्हा मुलीने सांगितलं की, बाबा आईला काठीने मारहत होता. आणि काठीने मारहाण करीत त्यांनी आईचा जीव घेतला.

हे ही वाचा-'मी बदनामी सहन करु शकत नाही', जळगावात विवाहितेचं टोकाचं पाऊल

सहा वर्षांपूर्वी प्रियकांचा लग्न झालं होतं. सुरुवातील सर्व ठीक होतं. मात्र काही महिन्यानंतर कौशल पत्नीला पैशांवरुन मारहाण करीत होता. तर दुसरीकडे प्रियंकाला दोन मुली असल्यामुळेही कौशल तिला टोमणे मारत तिचा मानसिक छळ करीत होता.

First published:

Tags: Alcohol, Bihar, Crime news, Murder