मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /अंडरवर्ल्ड डॉन छोटा शकील रचतोय बडे नेते आणि न्यायाधिशांच्या हत्येचा कट!

अंडरवर्ल्ड डॉन छोटा शकील रचतोय बडे नेते आणि न्यायाधिशांच्या हत्येचा कट!

दिल्लीतील बडे राजकीय नेते आणि कोर्टाचे न्यायाधिश छोटा शकीलच्या रडारवर आहेत.

दिल्लीतील बडे राजकीय नेते आणि कोर्टाचे न्यायाधिश छोटा शकीलच्या रडारवर आहेत.

दिल्लीतील बडे राजकीय नेते आणि कोर्टाचे न्यायाधिश छोटा शकीलच्या रडारवर आहेत.

आनंद तिवारी,(प्रतिनिधी)

नवी दिल्ली,7 फेब्रुवारी: पोलिसांच्या स्पेशल सेलने अंडरवर्ल्ड डॉन छोटा शकील (Chhota Shakeel) याच्याविरुद्ध एफआयआर नोंदवली आहे. दिल्लीतील बडे राजकीय नेते आणि कोर्टाचे न्यायाधिश छोटा शकीलच्या रडारवर आहेत. छोटा शकील राजकीय नेते आणि न्यायाधिशांच्या हत्येचा कट रचत असल्यची गोपनिय माहिती पोलिसांना मिळाली आहे.

एफआयआरनुसार, छोटा शकीलकडे हायग्रेड अनेक शस्त्र आहेत. पोलिसांच्या सेलला व्हॉट्सअॅप चॅटच्या माध्यमातून याबाबत ठोस पुरावे मिळाले आहेत. दिल्ली पोलिस आयुक्तांनी या प्रकरणात लक्ष घातले आहे.

निशाण्यावर अनेक नेते..

छोटा शकीलच्या रडारवर अनेक नेते असल्याने दिल्ली पोलिसांनी अलर्ट जारी केला आहे. तसेच महत्त्वाच्या नेत्यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. दाऊद इब्राहीमचा म्होरक्या छोटा शकील दिल्लीतील अनेक बड्या नेते आणि न्यायाधिशांच्या हत्येचा कट रचत आहे. याबाबत ठोस पुरावे दिल्ली पोलिसांच्या हाती लागले आहे.

कोण आहे छोटा शकील?

छोटा शकीलने 1980 च्या सुमारास मुंबई सोडली. कराचीत क्लिफ्टन परिसरात तो दाऊदच्या जवळच राहायला गेला. त्यांच्या इतक्या वर्षांच्या दोस्तीत मिठाचा खडा पडला आणि खटके उडाले. यामुळे सध्या या दोघांमध्ये फारकत झाल्याची चर्चा आहे.

सूत्रांनुसार, शकील हा दाऊदचा खास पंटर असून गेल्या तीन दशकांपासून ते गुन्हेगारी विश्वात एकत्र काम करत आहेत. दोघांनी 'डी गँग'चा दबदबा कायम ठेवला. मात्र, आता या दोघांमध्ये खटके उडाले आहेत. दाऊदचा लहान भाऊ अनिसने गँगच्या कारभारात हस्तक्षेप केल्याने या दोघांमध्ये वाद झाले आहेत. त्यानंतर दोघांनी एकमेकांपासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे.

First published:

Tags: Chhota shakeel, Mumbai news, Mumbai underworld, Underworld don, Underworld don daud abrahim