Home /News /crime /

लग्नघरातील आनंदावर विरजण; फोटो काढण्याच्या बहाण्याने नवरदेवाला गाडीतून उतरवून केला गोळीबार

लग्नघरातील आनंदावर विरजण; फोटो काढण्याच्या बहाण्याने नवरदेवाला गाडीतून उतरवून केला गोळीबार

ज्या घरात वरातीची वाट पाहत होते, त्याच घरात नवरदेवावर हल्ल्याची बातमी पोहचली आणि सगळे सुन्न झाले

    पाटना, 6 जून : ज्या घरात वरातीची वाट पाहत होते, त्याच घरात नवरदेवावर हल्ल्याची बातमी पोहचली आणि सगळे सुन्न झाले. क्षणाच आनंदाची जागा दुखाच्या कढांनी घेतली. बिहार राज्यात मोतिहरा जिल्ह्यात ही ह्रद्यद्रावक घटना घडली. मुरली या गावात मुलीच्या घरात असलेला उत्साह एका क्षणात मावळला. रस्त्यातच काही गुंडांनी नवऱ्यावर गोळीबार केला आणि त्याचा मृत्यू झाला. गोळीबार करुन हल्लेखोर फरार झाले. जखमी नवऱ्या मुलाला रुग्णालयात खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, सध्या या नवऱ्या मुलाचा मृत्यूशी संघर्ष सुरु आहे. शनिवारी संध्याकाळी ढाकाच्या कुशवंशी नगरमधून नवरा मुलगा चंदन कुमार याची वरात, मुरली या गावात येत होती. गावापासून थोड्या अंतरावर एका बाईकस्वार आणि त्याच्या साथीदारांनी वरात थांबवली. नवऱ्याचा फोटो काढण्याची विनंती केली, नवरा गाडीतून उतरला, त्याचा मोबाईलमध्ये फोटो काढला आणि त्यानंतर त्याच्यावर गोळीबार केला. सुखाचे क्षण क्षणात बदलले. हे ही वाचा-भाजप नगरसेवकाचं धक्कादायक कृत्य; भररस्त्यात महिला तलाठीला मारहाण, Video व्हायरल हा सर्व प्रकार इतका क्षणार्धात झाला, की कुणालाच काही कळाले नाही. हल्ला झाल्याचे लक्षात आल्यानंतर एकच गोँधळ उडाला. यानंतर नवऱ्या मुलाला तातडीने मोतिहारी शहरातील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. नवऱ्या मुलाच्या पोटीत गोळी मारण्यात आली असून, त्याची प्रकृती गंभीर आहे. हा सर्व प्रकार वरातीतील इतर नातेवाईकांना कळाल्यानंतर, आनंदाची जागा आता दुखाने घेतली आहे. गोळीबार का करण्यात आला, याचे कारण अद्यापही स्पष्ट झालेले नाही. पोलीस तपास करीत आहेत, मात्र काहीही सांगण्यास पोलिसांनी नकार दिला आहे. पोलिसांनी नवऱ्याची गाडी आणि ड्रायव्हरला ताब्यात घेतले आहे. ज्या मुलीशी विवाह होणार होता, तिला पाच बहिणी आहेत. या मुलीचे वडील बाहेरगावी असल्याची माहिती आहे, आणि तिच्या आईचा यापूर्वीच मृत्यू झाल्याचीही माहिती आहे. ता पोलीस या प्रकरणाचा शोध घेत आहेत.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Crime, Gun firing, Marriage

    पुढील बातम्या