मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

आईने विश्वासाने लेकीला चुलत्याकडे सोपवलं, काकाचं घृणास्पद कृत्य, पीडिता 5 महिन्यांची गर्भवती

आईने विश्वासाने लेकीला चुलत्याकडे सोपवलं, काकाचं घृणास्पद कृत्य, पीडिता 5 महिन्यांची गर्भवती

 बुलडाणा (Buldhana) ग्रामीण पोलीस ठाणे अंतर्गत असलेल्या एका गावात धक्कादायक घटना समोर आली आहे. एका चुलत्याने आपल्या 15 महिन्यांच्या पुतणीवर वारंवार अत्याचार (Rape) केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे.

बुलडाणा (Buldhana) ग्रामीण पोलीस ठाणे अंतर्गत असलेल्या एका गावात धक्कादायक घटना समोर आली आहे. एका चुलत्याने आपल्या 15 महिन्यांच्या पुतणीवर वारंवार अत्याचार (Rape) केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे.

बुलडाणा (Buldhana) ग्रामीण पोलीस ठाणे अंतर्गत असलेल्या एका गावात धक्कादायक घटना समोर आली आहे. एका चुलत्याने आपल्या 15 महिन्यांच्या पुतणीवर वारंवार अत्याचार (Rape) केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे.

  • Published by:  Chetan Patil

राहुल खंडारे, प्रतिनिधी

बुलडाणा, 30 नोव्हेंबर : बुलडाणा (Buldhana) ग्रामीण पोलीस ठाणे अंतर्गत असलेल्या एका गावात धक्कादायक घटना समोर आली आहे. एका चुलत्याने आपल्या 15 महिन्यांच्या पुतणीवर वारंवार अत्याचार (Rape) केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. नराधम काकाच्या या घृणास्पद कृत्यामुळे पीडिता पाच महिन्यांची गर्भवती असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे संबंधित परिसरात एकच खळबळ उडाली आहे. आरोपी काका आपल्या पुतणीसोबत इतकं विकृत कसं वागू शकतो? असा प्रश्न आता उपस्थित होतोय. या घटनेप्रकरणी पोलिसांनी नराधम काकाला बेड्या ठोकल्या आहेत.

नेमकं प्रकरण काय?

पीडित मुलीची आई ही कामानिमित्ताने बाहेरगावी गेली होती. ती आपल्या 15 वर्षीय मुलीला तिच्या काकाच्या घरी घेऊन गेली होती. महिलेने मोठ्या विश्वासाने आपल्या लेकीला काकाकडे राहण्यासाठी सुपूर्द केलं होतं. तेव्हापासून पीडिता गेल्या 11 महिन्यांपासून आपल्या काकाच्या घरी राहत होती. पीडितेचा काका तिला वडिलांसारखा जीव लावेल, तिची काळजी घेईल, असा विश्वास तिच्या आईला होता. पण पीडितेच्या काकाने विश्वासघात करत संतापजनक कृत्य केलं.

हेही वाचा : पतीपासून विभक्त राहणाऱ्या महिलेसोबत झाला घात; कालव्याशेजारी आढळला मृतदेह

पीडितेला जीवे मारण्याची धमकी

पीडिता घरात एकटी असल्याचं पाहून आरोपी काकाने तिच्यावर अत्याचार केला. या अत्याचाराबाबत कुणाला सांगितलं तर तुला मारुन टाकेन, अशी धमकी नराधम काकाने दिली. पीडिता गेल्या अकरा महिन्यांपासून आरोपी काकाच्या छळाला सामोरे जात होती. अखेर पीडितेची आई आपलं काम आटोपून आपल्या घरी आली. त्यानंतर ती दीराकडे आपल्या मुलीली घेण्यासाठी गेली. महिलेने पीडितेला आपल्या घरी आणलं.

पीडितेची आई पोलिसात

या दरम्यान मुलगी नाराज असल्याचं तिच्या निदर्शनास आलं. काहीतरी घडलंय याची चाहूल पीडितेच्या आईला लागली. आईने आपल्या लेकीला जवळ घेऊन नेमकं काय घडलंय याची विचारणा केली. यावेळी पीडितेने टाहो फोडला. पीडितेने आपल्यासोबत घडलेला सर्व घृणास्पद प्रकार आईला सांगितला. पीडितेच्या काकाने केलेल्या या घाणेरड्या कृत्याने आईलादेखील संताप आला. ती आपल्या लेकीला घेऊन पोलीस ठाण्यात गेली. तिथे महिलेने आपल्या मुलीसोबत घडलेला सर्व प्रकार सांगत आरोपी काकाची तक्रार केली. पोलिसांनी प्रकरणाचं गांभीर्य जाणून तातडीने कारवाईला सुरुवात केली. पोलिसांनी आरोपी काकाविरोधात गुन्हा दाखल केला.

हेही वाचा : सीलिंगमधून गोळी गेली आरपार; खालच्या मजल्यावर झोपलेल्या भारतीय मुलीचा गेला जीव

आरोपी काकाला बेड्या

पोलीस तक्रारीनंतर पीडित मुलीची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. या तपासणीचा अहवाल समोर आला तेव्हा पीडितेच्या आईच्या पायाखालची जमीनच सरकली. पीडिता पाच महिन्यांची गरोदर असल्याची माहिती त्यातून समोर आली. पोलिसांनी तातडीने आरोपी काकाला बेड्या ठोकल्या. पोलीस या प्रकरणी पुढील तपास करत आहेत. पण या घटनेने काका-पुतणीच्या नात्याला काळीमा फासली गेली आहे. याशिवाय विश्वास नेमका कुणावर ठेवायचा? असा प्रश्न उपस्थित होतोय.

First published: