पुन्हा काकाच ठरला राक्षस, 8 वर्षीय मुलीवर अत्याचार; महाराष्ट्रात 24 तासांत दुसरी घटना

पुन्हा काकाच ठरला राक्षस, 8 वर्षीय मुलीवर अत्याचार; महाराष्ट्रात 24 तासांत दुसरी घटना

या अत्याचाराने त्रस्त झालेल्या मुलीने तिच्यावर होणाऱ्या अमानुष घटनेची माहिती मावशीला सांगितली असता तिला धक्काच बसला.

  • Share this:

भिवंडी, 3 ऑक्टोबर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा बंद असल्याने गणपती सणापासून मावशीकडे पाहुणी म्हणून येऊन राहिलेल्या 8 वर्षीय मुलीवर काकाने वेळोवेळी अमानुष अत्याचार केल्याची संतापजनक घटना जांभुळपाडा (चावे )येथे समोर आली आहे. या घटनेने नात्याला काळीमा फासल्याने परिसरात संताप व्यक्त केला जात आहे.

जांभिवली येथे राहणारी आठ वर्षीय मुलगी शाळा बंद असल्याने मावशीकडे येऊन राहिली होती. या दरम्यान 26 वर्षीय काकाची तिच्यावर वाकडी नजर पडली आणि त्याने तिला दमदाटी करून वेळोवेळी तिच्यावर अमानुष अत्याचार केला. या अत्याचाराने त्रस्त झालेल्या भाचीने तिच्यावर होणाऱ्या अमानुष घटनेची माहिती मावशीला सांगितली असता तिला धक्काच बसला.

या घटनेने व्यथीत होऊन तिने अल्पवयीन मुलीला घेऊन गणेशपुरी पोलीस ठाणे गाठून झालेला प्रकार पोलीस ठाण्यात कथन केला. त्यानंतर पोलिसांनी बलात्कार व पोक्सॉअंतर्गत गुन्हा दाखल करून उशिराने अत्याचारी काकाला अटक केली आहे. या गुन्ह्याचे तपास अधिकारी तथा पोलीस ठाण्याचे वपोनि महेश सगडे यांनी अत्याचारी काकाला अटक केली आहे.

चंद्रपूरमध्येही घडली संताप आणणारी घटना

चंद्रपूर जिल्ह्यात 12 वर्षाच्या मुलीवर नात्यातील चुलत काकाने अत्याचार केल्याची घटना उजेडात आली आहे. गोंडपिंपरी तालुक्यातील येनबोथला गावातील ही घटना असून 26 वर्षीय आरोपीवर गुन्हा दाखल करून पोलिसांनी त्याला अटक केली आहे. 

घरात आजोबाचा मृत्यू झाला होता. त्यानंतर रिजीरिवाजानुसार त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यासाठी आलेल्या पाहुण्यांना जेवणाची पंगत वाढत असताना काकाने 12 वर्षीय पुतणी बाहेर गेल्याची संधी साधली आणि तिला ओढत घराशेजारी असलेल्या बांबूच्या रांजीत नेले व तिथेच तिच्यावर बलात्कार केला. गोंडपिपरी तालुक्यातील येनबोथला गावात काल रात्री साडेनऊ वाजताच्या सुमारास हा संतापदायक प्रकार समोर आला.

Published by: Akshay Shitole
First published: October 3, 2020, 10:06 PM IST

ताज्या बातम्या