मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /गुंडाराज! दिवाळीची शॉपिंग करताना तरुणावर वार, चाकू भोसकून भर रस्त्यात खून

गुंडाराज! दिवाळीची शॉपिंग करताना तरुणावर वार, चाकू भोसकून भर रस्त्यात खून

दिवाळीची खरेदी करायला (Uncle murders his nephew in open market on road) गेलेल्या तरुणाचा पाठलाग करून भोसकून खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीला आली आहे.

दिवाळीची खरेदी करायला (Uncle murders his nephew in open market on road) गेलेल्या तरुणाचा पाठलाग करून भोसकून खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीला आली आहे.

दिवाळीची खरेदी करायला (Uncle murders his nephew in open market on road) गेलेल्या तरुणाचा पाठलाग करून भोसकून खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीला आली आहे.

चंदिगढ, 4 नोव्हेंबर: दिवाळीची खरेदी करायला (Uncle murders his nephew in open market on road) गेलेल्या तरुणाचा पाठलाग करून भोसकून खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीला आली आहे. दिवाळीच्या आदल्या दिवशी बाजारपेठेत किरकोळ खरेदीसाठी गेलेल्या तरुणावर काही (murder while shopping for Diwali) गुंडांनी हल्ला करत मारहाण करायला सुरुवात केली. त्यानंतर स्वतःचा जीव वाचवण्यासाठी पळालेल्या तरुणाचा पाठलाग करत त्याचा जीव घेतला.

काका आणि पुतण्याचा वाद

हरियाणातील रेवाडीमध्ये राहणारा अमित नावाचा तरुण रिक्षा चालवून आपला चरितार्थ चालवत असे. इतर वेळेत तो एका चॅटच्या गाड्यावरही काम करत होता. त्याच्या नावावर असणाऱ्या एका वडिलोपार्जित जागेवरून त्याचे आणि त्याच्या चुलत्याचे वाद होते. शहरातील एक जागा अमितच्या वडिलांनी त्याच्या नावे केली होती. मात्र त्या जागेवर अमितच्या चुलत्याने दावा केला होता. याच वादातून त्याने अमितवर जीवघेणा हल्ला केल्याचं मानलं जात आहे.

भर रस्त्यात झाला हल्ला

अमित संध्याकाळी दिवाळीची मिठाई घेण्यासाठी दुकानात गेला होता. मिठाई घेऊन तो घरी गेला आणि पुन्हा काही किरकोळ खरेदी करण्यासाठी बाजारात गेला. रात्री सुमारे साडेदहा वाजता काही गुंडांनी अमितवर हल्ला केला. त्यानंतर स्वतःचा बचाव करण्यासाठी तो तिथून पळाला आणि एका सुनसान गल्लीत लपला. तिथंही गुंडांनी त्याचा पाठलाग केला आणि जबर मारहाण केली. त्यांच्या तावडीतून पुन्हा एकदा सुटलेल्या अमितने आणखी एका बोळात लपून स्वतःचा जीव वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र तिथंही गुंडांनी गाठत त्याच्या छातीत चाकूनं वार करून त्याचा बळी घेतला.

हे वाचा- नाशिक हादरलं ! आरपीआय महिला पदाधिकारीची निर्घृण हत्या, 20 ते 25 वेळा चाकू भोसकला

पोलीस तपास सुरू

पोलिसांनी या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. अमितचा मृतदेह पोस्टमॉर्टेमसाठी पाठवण्यात आला आहे. आपल्या भावानेच आपल्या मुलाचा जागेच्या वादातून बळी घेतल्याचा आरोप अमितच्या वडिलांनी केला आहे.

First published:

Tags: Crime, Haryana, Police