मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /घरात घुसून पुतण्याने केला काकाचा खून, नागपुरातील धक्कादायक घटना

घरात घुसून पुतण्याने केला काकाचा खून, नागपुरातील धक्कादायक घटना

घरात घुसून पुतण्याने काकाला काठीने बेदम मारहाण करून जीव घेतल्याची घटना समोर आली आहे.

घरात घुसून पुतण्याने काकाला काठीने बेदम मारहाण करून जीव घेतल्याची घटना समोर आली आहे.

घरात घुसून पुतण्याने काकाला काठीने बेदम मारहाण करून जीव घेतल्याची घटना समोर आली आहे.

नागपूर, 22 जानेवारी : नागपूरच्या (Nagpur) पाचपावली पोलीस स्टेशन (Pachpavli Police Station) अंतर्गत पंचशील नगर येथे नात्याला काळीमा फासणारी घटना घडली आहे. घरात घुसून पुतण्याने काकाला काठीने बेदम मारहाण करून जीव घेतल्याची घटना समोर आली आहे.

नागपूर शहरांमध्ये हत्याचे सत्र थांबण्याचे नाव घेत नाही आहे. गुरुवारी पंचशील नगरमध्ये मन सुन्न करणारी घटना घडली आहे. एका पुतण्याने स्वतःच्या काकांनाच घरात घुसून काठीच्या सहाय्याने त्यांची हत्या केली. अशोक मेश्राम असं मृत काकाचे नाव आहे. या प्रकरणी पाचपावली पोलिसांनी  पुतण्याला अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 9 वर्षांपूर्वी मृतक अशोक मेश्राम आणि आरोपी सारंग युवराज मेश्राम (वय 33) च्या वडिलांमध्ये भांडण झाले होते. या भांडणाचा  वचपा काढण्यासाठी आरोपीने आपल्याच काकाची हत्या केली असावी असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

1 दिवसांपूर्वी ही आरोपी आणि मृतक यांच्यामध्ये भांडण झाले होते आणि त्यानंतर त्याचे रूपांतर हे हत्येत झाले आहे.

मेश्राम याला प्रचंड दारूचे व्यसन होते. तो एका चिकनच्या दुकानात कामाला होता. दारुच्या व्यसनामुळे दोन वर्षांपूर्वीच त्याची पत्नी सोडून गेली होती. त्याच्या घराचे बांधकाम सुरू होते. त्यावरून पुतण्या सारंगसोबत त्याचे भांडण झाले होते. जुना वाद उकरून काढत त्याने पुतण्याला शिवीगाळ केली होती. त्यामुळे झालेल्या भांडणाचा बदला घेण्यासाठी पुतण्या खुन्नस मनात ठेवून होता. रात्री काका मेश्राम दारू पिऊन घरी झोपला होता. तेव्हा लाकडी दांडके घेऊन सारंग घरात गेला आणि डोक्यात सपासप प्रहार करून काकाचा जीव घेतला.

या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि आरोपी सांरगला अटक केली.  या घटनेमुळे संपूर्ण परिसरामध्ये भीतीचे वातावरण दिसून येत आहे.

First published:
top videos