मुंबईत हत्येचा भयंकर प्रकार, मोबाइल चार्जरची वायर तुटेपर्यंत आवळला मुलाचा गळा

मुंबईत हत्येचा भयंकर प्रकार, मोबाइल चार्जरची वायर तुटेपर्यंत आवळला मुलाचा गळा

मस्करीची झाली कुस्करी झाल्याचं आपण अनेकदा पाहिलं आहे. पण या मस्कीरमुळे एक भयंकर गुन्ह्याचा खुलासा मुंबईच्या घाटकोपरमध्ये झाला आहे.

  • Share this:

मुंबई, 02 मार्च : मस्करीची झाली कुस्करी झाल्याचं आपण अनेकदा पाहिलं आहे. पण या मस्करीमुळे एक भयंकर गुन्ह्याचा खुलासा मुंबईच्या घाटकोपरमध्ये झाला आहे. मुलगा वारंवार मस्ती करायचा म्हणून सख्खा काकानेच काटा काढल्याची घटना समोर आली आहे. मोबाइल चार्जरच्या वायरने 15 वर्षाच्या मुलाची हत्या केल्याचं घाटकोपर पश्चिमेतील गोळीबार रोडवर उघड झालं आहे.

शिव पवार असं हत्या झालेल्या मुलाचं नाव आहे. तो वारंवार मस्ती करायचा म्हणून त्याच्या काकाकडून त्याची हत्या करण्यात आली. हिंमत गोयल असं आरोपी काकाचं नाव आहे. शिवची आईला कामाला गेली म्हणून तो आत्याच्या घरी खेळत होता. थोड्या वेळाने आत्यादेखील कामानिमित्त बाहेर गेली. त्यानंतर शिवने काकांसोबत मस्ती करण्यास सुरुवात केली. यानंतर जे काही झालं त्यावर कोणाचा विश्वासच बसणार नाही.

शिव त्याचा काका हिंमतसोबत मस्ती करत होता. याचा आरोपी काकाला राग आला आणि त्याने शिवला मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यानंतर शिव धावत घराबाहेर गेला. काकाने मोबाइल चार्जरची वायर हातात घेवून शिवच्या मागे धाव घेतली. त्यानंतर शिव त्याच्या स्व:च्या घरात जाऊन लपला. रागाने चौताळलेला काका शिवच्या घरी गेला आणि त्याने शिवचा गळा वायरने आवळला.

हे वाचा - आई झालेल्या या महिला IAS चं जगभरातून कौतूक, कामगिरी पाहून तुम्हीही कराल सलाम

शिवचा जीव गेला हे लक्षात येताच आरोपी हिंमतने घराला टाळं लावलं आणि थेट पोलिसांत गेला. तिथे हिंमतने पोलिसांना चकवा देत शिवची हत्या त्याच्या एका चुलत भावाने केल्याचं सांगितलं. पण पोलिसांनी कसून तपास केला असता सगळं सत्य समोर आलं. पण या सगळ्यात शिवचा नाहक बळी गेल्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

हे वाचा - निर्भयाच्या दोषींना उद्याच फाशी? सर्वोच्च न्यायालयाने पवनची याचिका फेटाळली

शिवची आई घरी येताच तिने घराला टाळं पाहिलं. शेजाऱ्यांना बोलावून टाळं तोडलं आणि मोठा धक्काच बसला. घरात शिव बेशुद्ध अवस्थेत पडला होता. त्याला तात्काळ राजावाडी रुग्णालयात नेण्यात आलं पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. पण शविच्छेदनाचा अहवाल आल्यानंतर धक्कादायक खुलासा समोर आला. शिवच्या मानेवर हल्ल्याचे निशाण दिसले. त्यानंतर पोलिसांना हत्येचा संशय आला आणि संपूर्ण प्रकरणाचा तपास केला असता काकानेच हत्या केल्याचं उघड झालं.

हे वाचा - रश्मी वहिनींकडून अशा टीकेची अपेक्षा नाही - चंद्रकांत पाटील

First published: March 2, 2020, 1:17 PM IST

ताज्या बातम्या