मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

Parbhani : मेंढ्या शेतात बसवायच्या नाहीत, शेतीच्या वादात काकाने घेतला पुतण्याला चावा

Parbhani : मेंढ्या शेतात बसवायच्या नाहीत, शेतीच्या वादात काकाने घेतला पुतण्याला चावा

शेतीच्या वाटणीवरुन विनोद काचगुंडे यांच्या वडिलांचा चुलत्यासोबत वाद सुरू आहे. 29 मेला सकाळी साडेनऊ वाजेयच्या सुमारास गावात मेंढ्यावाले आले होते.

शेतीच्या वाटणीवरुन विनोद काचगुंडे यांच्या वडिलांचा चुलत्यासोबत वाद सुरू आहे. 29 मेला सकाळी साडेनऊ वाजेयच्या सुमारास गावात मेंढ्यावाले आले होते.

शेतीच्या वाटणीवरुन विनोद काचगुंडे यांच्या वडिलांचा चुलत्यासोबत वाद सुरू आहे. 29 मेला सकाळी साडेनऊ वाजेयच्या सुमारास गावात मेंढ्यावाले आले होते.

  • Published by:  News18 Desk

परभणी, 1 जून : काका पुतण्याच्या (Uncle Nephew News) आदर्श नात्यासंदर्भातील बातम्या तुम्ही वाचल्या असतील. अनेकांना हेवा वाटेल, असे काका-पुतण्याचं नातं असतं. मात्र, याच काका पुतण्याच्या नात्याला काळीमा फासणारी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. ही घटना परभणी (Parbhani) जिल्ह्यात समोर आली आहे.

काय आहे घटना?

एका काकाने आपल्या पुतण्याला थेट चावा (Uncle Bite Nephew) घेतल्याचे समोर आले आहे. मेंढ्या शेतात बसवायच्या नाहीत, असे सांगत काकाने पुतण्याच्या अंगठ्याला चावा घेतला. जिंतूर (Jintoor) तालुक्यातील कवठा येथील विनोद गुलाबराव काचगुंडे यांनी याप्रकरणी तक्रार दिली आहे. काकाने चावा घेतल्यानंतर पुतण्याला शिवीगाळ देखील केली. याप्रकरणी दोघांविरोधात बामणी पोलीस ठाण्यात (Bamni Police Station) गुन्हा दाखल झाला आहे.

शेतीच्या वाटणीवरुन विनोद काचगुंडे यांच्या वडिलांचा चुलत्यासोबत वाद सुरू आहे. 29 मे रोजी सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास गावात मेंढ्यावाले आले होते. या मेंढ्यावाल्यांना शेतात बसण्यासंदर्भात सांगितले होते. त्यावरुन चुलते अर्जुन काचगुंडे आणि त्यांची पत्नी कमलबाई काचगुंडे यांनी यावेळी विनोद यांच्यासोबत आमच्या शेतात मेंढ्या का बसवतोस म्हणून वाद घातला. इतकेच नव्हे तर अर्जुन काचगुंडे यांनी विनोद यांच्या उजव्या हाताच्या अंगठ्याचा चावा घेतला. त्यामुळे अंगठ्याला दुखापत झाली, असे विनोद यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.

हेही वाचा - Sanjay Biyani murder: बिल्डर संजय बियाणी यांच्या हत्येचा दोन महिन्यांच्या तपासानंतर उलगडा, हत्येच्या षडयंत्राबाबत धक्कादायक माहिती उघड

काकाचीही तक्रार -

तर तेच दुसरीकडे अर्जुन काचगुंडे यांनीदेखील जिंतूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. 29 मेला सकाली साडेनऊन वाजेच्या सुमारास मेढ्या का बसवतोस म्हणून गुलाब काचगुंडे, जिजाबाई काचगुंडे, विनोद काचगुंडे, सोनू काचगुंडे यांनी मला दगडाने, चापट बुक्क्याने मारहाण केली. तसेच जीवे मारण्याची धमकीही दिली. यानंतर त्यांनी दिलेल्या तक्रारीनंतरही चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

First published:

Tags: Crime news, Parbhani news