देवरिया, 28 जून : उत्तर प्रदेशातील देवरिया
(Deoria UP) जिल्ह्यातील एका गावात काका आणि पुतणीमध्येच
(Uncle Niece Love) सूत जुळले होते. याच प्रेमप्रकरणातून
(Deoria Love Story) त्यांनी एक धक्कादायक पाऊल उचलले. या घटनेने परिसरात सर्वत्र खळबळ उडाली आहे.
नेमकं काय घडलं -
उत्तरप्रदेशच्या देवरिया जिल्ह्यात काका आणि पुतणीमध्ये सूत जुळले होते. मात्र, त्यांनी या प्रेमप्रकरणातून सोमवारी विष घेत आत्महत्या केली. ही घटना बरहज पोलीस ठाणे
(Barhaj Police Station) परिसरातील आहे. तर, याप्रकरणी अजून कोणीही तक्रार दाखल केलेली नाही.
30 वर्षीय काका सचिन आणि त्याची 25 वर्षांची पुतणी या दोघांचे एकमेकांवर प्रेम होते. तसेच त्यांच्या प्रेमाची गावात आणि परिसरात खूप चर्चा होती. दोघांना लग्न करायचे होते. मात्र, गावातील काका-पुतणीच्या नात्याच्या बंधनामुळे त्यांचे लग्न होत नव्हते. अखेर नातेवाईकांनी समजवल्यानंतरही दोन्ही जण ऐकून घेत नव्हते. शेवटी दोघांनी एक धक्कादायक निर्णय घेत आत्महत्येचे पाऊल उचलले.
हेही वाचा - आधी नोकरी आणि नंतर लग्नाचं आमिष दाखवून बलात्कार; सोनिया गांधींच्या 71 वर्षीय स्वीय सचिवावर गुन्हा दाखल
काकाने आपली प्रेयसी असलेल्या पुतणीला गावाच्या बाहेर एका शेतात बोलावले. याठिकाणी आल्यावर दोघांनी विषारी पदार्थ खाल्ला. यामुळे या तरुणाचा जागेवरच मृत्यू झाला. तर त्याच्या पुतणीला नातेवाईकांनी गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान, तिचाही मृत्यू झाला.
पोलीस अधिकारी पंचम लाल यांनी या घटनेबाबत सांगितले की, बरहज पोलीस स्टेशन हद्दीतील एका गावात राहणाऱ्या सचिनचे त्याची पुतणीसोबत प्रेमसंबंध होते. सोमवारी दोघांनी शेतात जाऊन विष घेतले. तसेच त्यांनी सांगितले की, तरुण काही वेळातच तिथेच मृत्यू झाला. मात्र, मुलगी कशीतरी घरी पोहोचली आणि कुटुंबीयांना तिने घटनेची माहिती दिली. कुटुंबीयांनी मुलीला रुग्णालयात नेले. मात्र, तेथे तिचा मृत्यू झाला, अशी माहितीही पोलिसांनी दिली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.