प्रियकरासोबत नाही करता आले लग्न, नालासोपाऱ्यात 19 वर्षीय तरुणीने उचलले टोकाचे पाऊल

प्रियकरासोबत नाही करता आले लग्न, नालासोपाऱ्यात 19 वर्षीय तरुणीने उचलले टोकाचे पाऊल

गावातून लग्नासाठी कागदपत्र आणतो सांगून सुनिल गेला होता. पण काही दिवसांनी त्याच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल झाल्याने पोलिसांनी त्याला अटक केली.

  • Share this:

नालासोपारा, 05 ऑक्टोबर : मुंबईच्या वेशीवर असणाऱ्या नालासोपाऱ्यात ह्रदय पिळवटून टाकणारी घटना घडली असून एका 19 वर्षीय तरुणीने प्रियकरासोबत लग्न करू शकत नसल्याने गळफास घेवून आत्महत्या केली.  या प्रकरणी तुळींज पोलिसांनी प्रियकराला अटक केली आहे.

नालासोपारा परिसरातील 19 वर्षीय पीडित मुलीने 2 ऑक्टोबर रोजी घरात गळफास घेवून आत्महत्या केली. पोलीस आणि परिसरातील काही टवाळ तरुणांच्या असभ्य वर्तणुकीला कंटाळून तिनं आपलं आयुष्य संपवल्याचा आरोप तिच्या कुटुंबीयांनी केला आहे.

हातात खडू पकडायला बोटं नाही, पण प्रतिभा खचल्या नाही; जगण्याला बळ देणारा VIDEO

पीडित मुलीचं सुनिल माने या मुलाबरोबर प्रेम होतं. लग्नाचं आमिष देवून, सुनिलनं पीडित मुलीला 14 ऑगस्ट 2020 ला घरातून पळवून नेलं होतं. मात्र, आई वडिलांनी पोलिसांत धाव घेऊन बेपत्ता असल्याचा गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर पोलिसांनी मुलीला आणि तिच्या प्रियकाराला ताब्यात घेतले होते. त्यानंतर मुलीला आई वडिलांच्या स्वाधीन केलं.

मात्र, सुनिलने लग्नाचं वचन त्या तरुणीला दिलं होतं. गावातून लग्नासाठी कागदपत्र आणतो सांगून सुनिल गेला होता. पण काही दिवसांनी त्याच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल झाल्याने पोलिसांनी त्याला अटक केली. त्यामुळे दोघांचं लग्न होवू शकले नाही.

या प्रकरणानंतर  पीडित मुलीने हताश होवून आपल्यावर अत्याचार झाल्याची तक्रार 15 सप्टेंबरला सुनिल माने याच्याविरोधात तुळींज पोलीस ठाण्यात दिली.  पण तरीही 'आपल्याला सुनिल सोबतच लग्न करायचे आहे, त्याला  जेलमध्ये टाकू नका' अशी विनवणी ती करत होती.

पुणे हादरले! पोलीस आयुक्तालयाजवळच गोळीबार, 6 तासांमधली दुसरी हत्या

अखेर तिने 2 ऑक्टोबर रोजी रात्री आपल्या राहत्या घरी ओढणीने गळफास लावून आत्महत्या केली. मृत तरुणीने आत्महत्या करण्यापूर्वी 2 सुसाइड नोट लिहिल्या होत्या. त्यातील एका नोटमध्ये तिने 'माझ्या आत्महत्येला कुणालाही जबाबदार धरू नये', असं म्हटले असून पोलिसांनी तिला त्रास दिल्याचा कुठेही तिने उल्लेख केलेला नाही.  परंतु, पोलीस आणि शेजारी तरुणांमुळे तिने आत्महत्या केल्याचा आरोप तिच्या कुटुंबीयांनी केला आहे.

पोलिसांनी याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे. दोषींवर चौकशी करून कारवाई करणार असल्याचं अपर पोलीस अधीक्षक विजयकांत सागर यांनी सांगितले आहे.

शिवसेनेनं जिंकून दाखवलं, सलग तिसऱ्यांदा विजयी होत शिवसैनिकाने भाजपला हरवलं

दरम्यान, या घटनेची दखल घेऊन भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी वसईचे अपर पोलीस अधीक्षक विजयकांत सागर यांची भेट  घेवून कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसंच राज्यात बलात्काराच्या घटना वाढत असून या प्रकरणातील दोषी अधिकाऱ्यावर कारवाई करण्याची मागणीही वाघ यांनी केली आहे.

Published by: sachin Salve
First published: October 5, 2020, 5:47 PM IST
Tags:

ताज्या बातम्या