Home /News /crime /

दुसऱ्या पुरुषासोबत शारीरिक संबंध ठेवल्याचा संशय, पतीने पत्नीला पेटवून दिलं

दुसऱ्या पुरुषासोबत शारीरिक संबंध ठेवल्याचा संशय, पतीने पत्नीला पेटवून दिलं

पत्नीला पेटवणारा नराधम पती फरार झाला असून पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला आहे.

  उल्हासनगर, 4 जानेवारी : चारित्र्याच्या संशयावरून पतीने पत्नीला पेटवल्याची धक्कादायक घटना उल्हासनगर इथं घडली आहे. या घटनेत महिला 75 टक्के भाजली असून सध्या रुग्णालयाच तिच्यावर उपचार सुरू आहेत. पत्नीला पेटवणारा नराधम पती फरार झाला असून पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला आहे. उल्हासनगर शहरातील विठ्ठलवाडी इथं राहणाऱ्या आत्माराम पवार याने पत्नी सुमन पवार हिच्यावर चारित्र्याचा संशय घेतला. पत्नीचे दुसऱ्या पुरुषासोबत शारीरिक संबंध आहेत, असा त्याचा आरोप होता. याच कारणावरून पती-पत्नीमध्ये वारंवार खटके उडत असत. चालक असलेल्या आत्माराम पवार याला दारूचं व्यसनही होतं. लग्नाला जाताना कार 200 फूट नदीपात्रात कोसळली, वृद्ध महिला जागीच ठार गुरुवारी रात्री सुमन पवार या घरी स्वयंपाक बनवत होत्या. त्यावेळी आरोपी आत्माराम हा दारू पिऊन घरी आला. त्यानंतर चारित्र्याचा संशय घेत त्याने पत्नीसोबत भांडण करण्यास सुरुवात केली. काही वेळातच या भांडणाने टोक गाठलं. हे सगळं सहन न झाल्याने सुमन पवार यांनी आपल्या अंगावर रॉकेल ओतून घेतलं. दारूच्या नशेत असलेल्या आत्मारामने त्यांच्या अंगावर काडीपेटीतील काडी पेटवून टाकली. यामध्ये सुमन पवार या 75 टक्के भाजल्या आहेत. त्यानंतर सुमन पवार यांना उपचारासाठी ठाण्यातील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे. दरम्यान, पवार दाम्पत्याला 3 मुलं आहेत. घरात घडलेल्या या प्रकारामुळे ही चिमुकली आता उघड्यावर पडली आहेत.

  तुमच्या शहरातून (महाराष्ट्र)

  Published by:Akshay Shitole
  First published:

  Tags: Ulhasnagar crime, Ulhasnagar news

  पुढील बातम्या