Home /News /crime /

धक्कादायक! नर्स पेशाला काळीमा, 8 मुलांचा जीव घेतला अन् 10 जणांच्या हत्येचा रचला डाव

धक्कादायक! नर्स पेशाला काळीमा, 8 मुलांचा जीव घेतला अन् 10 जणांच्या हत्येचा रचला डाव

ही नर्स आहे की वैरीण? 8 मुलांची हत्या आणि 10 चिमुरड्यांच्या हत्येचा प्रयत्न एका नर्सने केला आहे. परिचारिकेच्या पवित्र पेशाला तिने काळीमा फासला.

    लंडन, 12 नोव्हेंबर: हॉस्पिटलमधील नर्स म्हणजे आपल्यासाठी एखाद्या देवदुतासारखीच असते. डॉक्टरांच्या बरोबरीने नर्सही लोकांचे जीव वाचवण्यात मदत करतात. पण ल्यूसी नावाच्या एका नर्सने पवित्र पेशाला काळीमा फासला आहे. यूकेमध्ये एका हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या या नर्सवर आत्तापर्यंत 8 मुलांच्या हत्येचा आरोप आहे. तसंच आणखी 10 मुलांची हत्या केल्याचा प्रयत्न ल्यूसीने केला आहे. असा पोलिसांचा आरोप आहे. ल्यूसीवर झालेल्या आरोपांचा सध्या पोलिसांकडून तपास सुरू आहे. यूकेच्या चेस्टर हॉस्पिटलमध्ये सन 2015- 16च्या दरम्यान अनेक मुलांचा संशयास्पद मृत्यू होत होता. हृदय किंवा फुफ्फसं निकामी झाल्यामुळे मुलांचा मृत्यू होत असल्याचं निदान होत होतं. पण धक्कादायक बाब म्हणजे या सगळ्या मुलांच्या हाता-पायावर वेगळ्याच प्रकारच्या छोट्याच्या जखमा सापडत होत्या. त्यामुळे त्यांचा मृत्यू नक्की कशामुळे होत आहे. हे स्पष्ट होत नव्हतं. त्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला. आणि याप्रकरणी ल्यूसी नावाच्या नर्सला सर्वात आधी अटक करण्यात आली. 2018 साली तिला अटक झाली त्यानंतर तिला जामिनावर सोडून देण्यात आलं. 2019मध्ये पुन्हा ल्यूसीला अटक करण्यात आली. आता पुन्हा एकदा ल्यूसी आरोपीच्या पिंजऱ्यात अडकली आहे. ल्यूसीवर असले आरोप होत असताना तिच्या मित्राचं असं म्हणणं आहे की, ल्यूसी असं काही करुच शकणार नाही. ती एक प्रोफेशनल नर्स आहे. आणि तिने तिच्या करिअरसाठी प्रचंड मेहनत केली आहे. मुलांची हत्याच काय पण ती साधी माशीही मारू शकत नाही. तिच्या शेजारच्या लोकांनीही तिच्या वर्तणुकीबद्दल चांगलाच शेरा दिला आहे. त्यामुळे मुलांच्या हत्येचं आणि ल्यूसीचं नक्की काय गौडबंगाल आहे याचा तपास पोलीस करत आहेत. ल्यूसीने या आधी लिव्हरपूल वूमेन्स हॉस्पिटलमध्ये काम केलं होतं. त्यानंतर तिने चेस्टर हॉस्पिटलमध्ये नोकरी पत्करली. 2013 साली तिच्या युनिटमधील 2 मुलांचा संशयास्पद मृत्यू झाला होता. 2015 मध्ये ती संख्या 8 वर गेली. त्यानंतर पुन्हा 5 मुलांचा मृत्यू झाला. त्यामुळे ल्यूसीबद्दल पोलिसांचा संशय अधिकच वाढला. पोलीस याचा अधिक तपास सध्या करत आहेत.
    Published by:Amruta Abhyankar
    First published:

    Tags: Crime news

    पुढील बातम्या