मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

धक्कादायक! विष घेऊन महिलेनं संपवलं आयुष्य, मांडीवर लिहिली सुसाईड नोट

धक्कादायक! विष घेऊन महिलेनं संपवलं आयुष्य, मांडीवर लिहिली सुसाईड नोट

या प्रकरणी पोलिसांनी पती आणि सासरच्यांविरोधात आता गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

या प्रकरणी पोलिसांनी पती आणि सासरच्यांविरोधात आता गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

या प्रकरणी पोलिसांनी पती आणि सासरच्यांविरोधात आता गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

  • Published by:  Kranti Kanetkar
उदयपूर, 29 ऑगस्ट : पतीच्या जाचाला कंटाळून एका महिलेनं आयुष्य संपवल्याचा धक्कादायक प्रकार उदयपूरमध्ये समोर आला आहे. या महिलेनं विष पिऊन आत्महत्या केल्यानं मोठी खळबळ उडाली. उदयपूर इथल्या सेमारी पोलीस स्थानक परिसरात ही घटना घडली आहे. आत्महत्येपूर्वी या महिलेनं सुसाईट नोट लिहिली होती. धक्कादायक बाब म्हणजे भिंतीवर किंवा कुठल्या कागदावर नाही तर या महिलेनं मांडीवर ही सुसाईट नोट लिहिली. पोलिसांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी तपास चालू केला आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवल्यानंतर ही सुसाइड नोट समोर आली. या महिलेवर थेट अंत्यसंस्कार झाले असते तर कदाचित तिच्या आत्महत्येचं गूढ उकलणं शक्य होऊ शकलं नसतं पण पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनाला पाठवल्यानं ही माहिती समोर आली. हे वाचा-पिंपरी चिंचवडमध्ये बहिणीच्या नवऱ्याने तरुणीवर केला कुऱ्हाडीने हल्ला या मृत महिलेनं आपला पती आपल्याला शारीरिक आणि मानसिक त्रास देत असल्याचं मांडीवर या महिलेनं लिहिलं होतं. सेमारीच्या मल्लाडा गावात रेखा मेघवाल नावाच्या विवाहितेने विष प्राशन करून आत्महत्या केली. महिलेचा मृत्यू संशयास्पद असल्याचे पाहून माहेरच्यांनी शवविच्छेदनाची मागणी केली. त्यानंतर जे समोर आलं त्यानं महिलेच्या माहेरच्यांना मोठा धक्का बसला. पती मानसिक आणि शारीरिक छन करत असल्याचं मांडीवर लिहिलं होतं. याशिवाय मी सुसाईड नोट लिहून आत्महत्या केली असती तर माझ्या पतीनं ते पत्र फाडून टाकलं असतं असाही उल्लेख या महिलेनं केला आहे. त्यासाठी मी माझ्या मांडीवर ही सुसाइड नोट लिहित आहे. 'मानसिक छळ करून रात्रंदिवस माझा पती मला मारत असल्यानं मी कंटाळून आत्महत्या करत आहे' असंही या महिलेनं सुसाईड नोटमध्ये पुढे म्हटलं आहे. हे वाचा-जन्मदाता बापच निघाला नराधम, 9 वर्षाच्या लेकीवर लॉकडाऊनमध्ये रोज केला बलात्कार या प्रकरणी पोलिसांनी पती आणि सासरच्यांविरोधात आता गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे. शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांकडे सोपवला आहे. याप्रकरणी सध्या पोलिसांचा तपास सुरू असून आरोपीविरोधात कारवाई करू असं आश्वासन मृत महिलेच्या नातेवाईकांना देण्यात आलं आहे.
First published:

Tags: Udaypur

पुढील बातम्या