उबर कॅबमध्ये महिलेला लागली झोप, उठली तेव्हा ड्रायव्हर करत होता बलात्कार

उबर कॅबमध्ये महिलेला लागली झोप, उठली तेव्हा ड्रायव्हर करत होता बलात्कार

पीडित तरुणी मित्रांसह रात्रीच्या पार्टीनंतर आपल्या घरी निघाली होती. पोलिसांचे म्हणणे आहे की, उबर चालकाने महिलेशी संबंध ठेवल्याची कबुली दिली आहे.

  • Share this:

कॅलिफोर्निया, 13 जानेवारी : एका पार्टीतून घरी परतत असताना उबर चालकाने बलात्कार केल्याचा आरोप एका महिलेने केला आहे. या महिलेचे म्हणणे आहे की, पार्टीत दारू प्यायल्यानंतर ती एक टॅक्सी पकडली आणि वाटेत तिला झोप लागली. जेव्हा तिला झोपेतून उठवले तेव्हा तिला लक्षात आली की ड्रायव्हरने तिच्यावर बलात्कार केला आहे. उबर कॅबमध्ये बलात्काराचे हे प्रकरण अमेरिकेच्या कॅलिफोर्नियामधील फोंटाना येथील आहे. महिलेच्या वतीने उबर ड्रायव्हरवर बलात्काराचा गुन्हा दाखल झाल्याची पुष्टी स्थानिक पोलिसांनी केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी मित्रांसह रात्रीच्या पार्टीनंतर आपल्या घरी निघाली होती. पोलिसांचे म्हणणे आहे की, उबर चालकाने महिलेशी संबंध ठेवल्याची कबुली दिली आहे. पण महिलेने संबंध करण्यासाठी परवाणगी दिल्याची धक्कादायक माहितीही चालकाने सांगितली.

इतर बातम्या - ट्रेनरने Gym मालकावर सत्तुरने केले सपासप 17 वार, हत्येचा थरकाप उडवणार VIDEO

रविवारी महिलेने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या महिलेने शनिवारी रात्री पार्टी केली आणि त्यानंतर उबर कॅब बूक केली. संशयित उबर चालकाची ओळख पोलिसांनी अलोन्सो कॅले म्हणून केली आहे. त्याने स्वत: पोलिसांकडे संपर्क साधला. पोलिसांशी संपर्क साधल्यानंतर अलोन्सो म्हणाला की हे सगळं एकमत झाले, परंतु महिला खोटं बोलत आहे.

जेव्हा अलोन्सोची विचारपूस केली तेव्हा त्याने सांगितले की फोंटाना येथील मॅक्डर्मोट पार्कमध्ये त्याने पीडित महिलेबरोबर संबंध ठेवले. परंतु ड्रायव्हरच्या बोल्यावर पीडितेने त्याच्यावर बलात्काराचा आरोप केला आहे. ड्रायव्हरने कबूल केले की तो स्त्री नशेत होती त्यामुळे तिच्या हे लक्षात नसावे.

इतर बातम्या - VIDEO : आईची बॉलिंग आणि मुलाची बॅटिंग, तुमच्या आयुष्यातही आला असेल असा क्षण!

पोलिसांनी बलात्काराच्या आरोपावरून चालकाविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. ड्रायव्हरला अटकही करण्यात आली असून त्याला न्यायालयात हजर केले जाईल. उबर कॅबमध्ये महिलांवर लैंगिक शोषण आणि बलात्काराच्या अनेक घटना भारतासह जगातील बर्‍याच देशांमध्ये नोंदल्या गेल्या आहेत. ऑगस्ट 2019 मध्ये बेंगळुरूमध्ये एक प्रकरण उघडकीस आले. त्यानंतर एका महिलेने मध्यरात्रीच्या सुमारास उबर चालकाने तिच्याशी गैरवर्तन केल्याचा आरोप केला होता.

इतर बातम्या - VIDEO : तानाजी चित्रपट सुरू असताना थिएटरमध्येच तुफान हाणामारी

Published by: Renuka Dhaybar
First published: January 13, 2020, 6:30 PM IST
Tags:

ताज्या बातम्या