मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

एटीएम फोडण्यासाठी दोघे आत घुसले, पोलिसांनी बाहेरून शटर केले बंद, पण तरीही...

एटीएम फोडण्यासाठी दोघे आत घुसले, पोलिसांनी बाहेरून शटर केले बंद, पण तरीही...

 त्याच दरम्यान आतील चोरट्यांनी त्यांच्या कडील लोखडी टॉमीने होम ठोबळे यांच्या हातावर मारून दुखापत केली.

त्याच दरम्यान आतील चोरट्यांनी त्यांच्या कडील लोखडी टॉमीने होम ठोबळे यांच्या हातावर मारून दुखापत केली.

त्याच दरम्यान आतील चोरट्यांनी त्यांच्या कडील लोखडी टॉमीने होम ठोबळे यांच्या हातावर मारून दुखापत केली.

जुन्नर, 31 डिसेंबर : पुणे (Pune) जिल्ह्यात तसंच इतर ठिकाणी एटीएम चोरीचे (atm machine robbery) गुन्हे मोठ्या प्रमाणात होत असल्यामुळे  हद्दीमधील रात्री गस्त अधिकारी कर्मचारी यांनी जास्त लक्ष हे एटीएम व बंद फ्लॅटमध्ये चोरी होवू नये यासाठी पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला. त्यामुळे एटीएम मशीन फोडण्यासाठी आलेल्या चोरट्यांना  सराईत चोरांना पोलिसांनी रंगेहाथ पकडले आहे. नारायणगाव पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी हिंगे, पोलीस नाईक दिनेश साबळे, पोलीस कर्मचारी शेख, होम ठोबळे, सातपुते, पठाण, ताजणे असे रात्री गस्त व एटीएम चेक करत असताना होम ठोबळे, पठाण यांना एसबीआय एटीएममध्ये 2 इसम हे सदर मशीनचे शटर अर्धे लावून आतमध्ये चोरी करण्याचा प्रयत्न करत होते. प्रसंगावधान राखून होम ठोबळे व पठाण यांनी शटर खाली ओढून बंद केले. त्याच दरम्यान आतील चोरट्यांनी त्यांच्या कडील लोखडी टॉमीने होम ठोबळे यांच्या हातावर मारून दुखापत केली. महाराष्ट्रासाठी महत्त्वाची बातमी, पुण्यासह 4 जिल्ह्यात 2 जानेवारीला कोरोना ड्राय त्यानंतर याबाबत सहायक पोलीस निरीक्षक दत्तात्रय  गुंड यांना माहिती देवून लगेचच हिंगे, पोलीस नाईक दिनेश साबळे, लोंढे, शेख,  काळूराम साबळे, पोलीस कॉन्स्टेबल दुपारगुडे, कोबल, अरगडे, लोहोटे, जायभाये, वाघमारे, कोतकर होम ढवळे, खंडे पोलीस मित्र भरत मुठे, ईश्वर पाटे ऋषिकेश कुंभार व इतर 20 ते 30 असे सदर ठिकाणी जमा झाले. सदरचे आरोपी  सराईत असून त्यांच्याकडे हत्यार असल्याची शक्यता असल्याने सुरक्षीततेबाबत योग्य ती खबरदारी घेऊन  लोंढे, साबळे, पोलीस काॅन्स्टेबल वाघमारे, कोबल यांनी शटरवर करून सदर आरोपीना ताब्यात घेवून पोलीस स्टेशनला आणले. पोलिसांनी या चोरट्यांकडे विचारणा केली असता  राहुल वसंत सुपेकर, बाजीराव बाळासाहेब नागरगोजे यांना ताब्यात घेतले असून त्याच्या विरुद्ध नारायणगाव पोलीस स्टेशनमध्ये 416/2020 भा.द.वि कलम 353,332,380,427,551,34 वगैरे कलमान्वये गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास  पोलीस करत आहे. सदर कामगिरी ही आभिनव देशमुख  पोलीस अधिक्षक,  विवेक पाटील, अपर पोलीस अधिक्षक मंदार जवळे यांच्या मार्गदर्शनाखाली दत्तात्रय गुंड, हिंगे, पोलीस नाईक दिनेश साबळे,पो.ना. लोंढे, पो.ना. शेख, पो.ना.काळूराम साबळे, पो.कॉ. दुपारगुडे, कोबल, अरगडे,लोहोटे, जायभाये, वाघमारे, कोतकर होम ढवळे, खंडे यांनी केली आहे.
Published by:sachin Salve
First published:

पुढील बातम्या