मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

एकाच वेळी दोन तरुणांची हातावर प्रेयसीचं नाव लिहून रेल्वेसमोर उडी; दोघांचा मृत्यू

एकाच वेळी दोन तरुणांची हातावर प्रेयसीचं नाव लिहून रेल्वेसमोर उडी; दोघांचा मृत्यू

एकाच गावातील दोन युवकांनी रेल्वेसमोर उडी घेवून आत्महत्या (Suicide) केली आहे. या तरुणांनी आत्महत्येपूर्वी स्वतःच्या हातावर आपापल्या प्रेयसींची नावं लिहिली होती. या घटनेनं परिसरात खळबळ उडाली आहे.

एकाच गावातील दोन युवकांनी रेल्वेसमोर उडी घेवून आत्महत्या (Suicide) केली आहे. या तरुणांनी आत्महत्येपूर्वी स्वतःच्या हातावर आपापल्या प्रेयसींची नावं लिहिली होती. या घटनेनं परिसरात खळबळ उडाली आहे.

एकाच गावातील दोन युवकांनी रेल्वेसमोर उडी घेवून आत्महत्या (Suicide) केली आहे. या तरुणांनी आत्महत्येपूर्वी स्वतःच्या हातावर आपापल्या प्रेयसींची नावं लिहिली होती. या घटनेनं परिसरात खळबळ उडाली आहे.

  • Published by:  News18 Desk

बूंदी, 8 मार्च : एकाच गावातील दोन युवकांनी सुसाट वेगाने येणाऱ्या रेल्वेसमोर उडी मारुन आत्महत्या (Suicide) केल्याची घटना समोर आली आहे. या तरुणांनी आत्महत्येपूर्वी स्वतःच्या हातावर आपापल्या प्रेयसींची (Wrote lovers name on hand) नावं लिहिली होती. एकाच वेळी अशाप्रकारे केलेल्या आत्महत्येने (2 Young men Deaths) गावात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तसंच पोलिसांनी शवविच्छेदन झाल्यानंतर दोन्ही तरुणांचा मृतदेह संबंधितांच्या कुटुंबीयांकडे सोपावला आहे. या दोन्ही तरुणांच्या आत्महत्येचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलं नाही. पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित प्रकरण राजस्थानातील बूंदी जिल्ह्यातील एकाच गावातील आहे. येथील दोन तरुणांच दोन वेगवेगळ्या युवतींसोबत प्रेम प्रकरण सुरू होतं. या दोघांनी आपल्या हातावर आपापल्या प्रेयसींची नावं लिहून सुसाट वेगाने येणाऱ्या रेल्वेसमोर उडी घेतली. या दुर्दैवी घटनेत दोन्ही तरुणांचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे. आत्महत्या करण्यापूर्वी या दोन्ही तरुणांनी त्यांच्या मोबाईलवर एक व्हिडीओ देखील बनवला आहे. यातील एक तरुण शिकत होता, तर दुसरा एका दुकानात काम करत होता.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री उशिरा ही घटना केशवरायपाटन परिसरातील दिल्ली-मुंबई रेल्वे ट्रॅकवर घडली. यानंतर ग्रामस्थांनी माहिती दिल्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले. हे दोन्ही तरुण केशवपूर येथील रहिवाशी असून महेंद्र गुर्जर आणि देवराज गुर्जर अशी दोन्ही तरूणांची नावं आहेत. या दोन्ही तरुणांच्या हातावर दोन वेगवेगळ्या मुलींची नावं लिहिली होती.

महेंद्र गुर्जर हा सध्या रीट परीक्षेची तयारी करीत होता, तर देवराज गुर्जर हा एका दुकानात काम करत होता. तर यातील महेंद्र विवाहित होता, तर देवराज हा अविवाहित होता. दोघंही बूंदी या ठिकाणी भाड्याने खोली घेवून राहात होते.

(वाचा - तिघांनी मुलाच्या प्रायव्हेट पार्टमध्ये व्हॅक्यूम क्लीनरनं भरली हवा, मृत्यू)

दोन वेगवेगळ्या मुलींसोबत होते प्रेमसंबंध

दोन वेगवेगळ्या मुलींसोबत त्यांचे प्रेमसंबंध सुरू होते, अशी प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे. त्यांच्या प्रेमात आलेल्या अडचणींमुळे त्यांनी आत्महत्या केली असावी, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. हे दोन्ही तरुण रात्री उशीरा दुचाकीने केशवपुर गावातून केशवरायपाटन भागात  आले होते. आत्महत्येपूर्वी त्यांनी एक व्हिडीओ बनवला आहे, यानंतर त्यांनी रेल्वेसमोर उडी घेतली. यांच्या आत्महत्येमागचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट नसून पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू आहे.

First published:

Tags: Crime, Crime news, Rajasthan, Suicide