Home /News /crime /

उत्तर प्रदेशात घेतले स्वस्तात पिस्तुल, आणले विकायला कल्याणमध्ये, पण...

उत्तर प्रदेशात घेतले स्वस्तात पिस्तुल, आणले विकायला कल्याणमध्ये, पण...

कमी श्रमात चांगले पैसे मिळतील, या आशेने या दोघांनी उत्तर प्रदेशमध्ये कमी किंमतीत हे पिस्तुल विकत घेतले होते.

कल्याण, 11 ऑक्टोबर : कल्याणमधील गौरीपाडा परिसरात एक पिस्तुल आणि चार जिवंत काडतूस विकण्यासाठी आलेल्या दोन जणांना खडकपाडा पोलिसांनी अटक केली आहे. सुशील भोंडवे आणि गौरव खर्डीकर अशी दोन्ही आरोपींची नावे आहेत. कोरोना लॉकडाउनमुळे मागील 6 महिन्यांपासून हाताला काम नसल्यामुळे ओढवलेल्या आर्थिक परिस्थितीवर मात करण्यासाठी या मजुरांनी गुन्हेगारीचा मार्ग अवलंबिला असल्याची माहिती पोलीस तपासात उघड झाली आहे. कमी श्रमात चांगले पैसे मिळतील, या आशेने या दोघांनी उत्तर प्रदेशमध्ये कमी किंमतीत हे पिस्तुल विकत घेतले होते. त्यानंतर कल्याणातील ग्राहकाला ते जादा किंमतीत विकत देण्याचा त्याचा प्रयत्न होता. मात्र, त्याआधीच ते पोलिसांच्या तावडीत सापडले. 'हे काम कायद्यानेच थांबवा, पण सुरुवात भाजपपासून करा', राऊतांचा शहांवर निशाणा खडकपाडा पोलिसांना खबऱ्या मार्फत  दोन व्यक्ती हे पिस्तुल विकण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी सापळा लावला. अखेर, पोलिसांनी मोठ्या शिताफीने  सुशील आणि गौरव या दोन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले.  सुशील याच्याकडे एक पिस्तुल तर गौरवकडे चार जिवंत काडतुसे सापडले आहे. पोलिसांनी पुढील तपासासाठी दोघांना ताब्यात घेत चौकशी केली असता लॉकडाउनमध्ये हाताला काम नसल्यामुळे आर्थिक परिस्थिती डबघाईला आली. यावर मात करण्यासाठी हा मार्ग निवडल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, हे दोघे सदर पिस्तुल कुणाला विकणार होते. याचा तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. मात्र, या घटनेमुळे लॉकडाउननंतर आता गुन्हेगारी वाढण्याची चिंता पोलिसाकडून व्यक्त केली जात आहे. कल्याण रेल्वे कॅन्टीनच्या इमारतीचा भराव टाकताना आढळला मृतदेह दरम्यान, 10 ऑक्टोबर रोजी कल्याण रेल्वे स्टेशनजवळ असलेल्या वालधुनी परिसरात रेल्वे कॅन्टीनच्या इमारतीचं काम सुरू आहे. जमिनीवर भराव टाकताना मातीत एक मृतदेह आढळून आला. त्यामुळे एकच खळबळ उडाली. एकमेकांवर विमानं आदळल्यामुळे 5 जणांचा मृत्यू; हवेतच झाले दोन तुकडे रेल्वेकडून कॅन्टीनसाठी इमारत उभारण्याचे काम सुरू असून याठिकाणी शनिवारी सकाळी साडे आठ वाजण्याच्या सुमारास भराव टाकण्याचं काम सुरू होतं. यादरम्यान हा मृतदेह आढळून आला. अज्ञात व्यक्तीनं हत्या करून पुरावा नष्ट करण्यासाठी येथील मातीत मृतदेह पुरल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. याप्रकरणी महात्मा फुले चौक पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मृतदेहाची ओळख पटवण्याचं काम सुरू असल्याची माहिती सहायक पोलीस आयुक्त अनिल पोवार यांनी दिली आहे.
Published by:sachin Salve
First published:

Tags: कल्याण

पुढील बातम्या