बापरे...सततच्या त्रासाला कंटाळून दोन बायकांनी केली नवऱ्याची हत्या

बापरे...सततच्या त्रासाला कंटाळून दोन बायकांनी केली नवऱ्याची हत्या

त्याच्या मारहाणीला त्या कंटाळल्या होत्या. त्यामुळे त्यांनी त्याचा काटा काढण्याचा निर्णय घेतला आणि त्याला कायमचं संपवलं.

  • Share this:

मुंबई 05 डिसेंबर : नवऱ्याच्या दररोजच्या त्रासाला कंटाळून त्याच्या दोन बायकांनी त्याची हत्या केल्याची खळबळजनक घटना मुंबईतल्या गोरेगावमध्ये घडलीय. हा नवरा त्याच्या दोनही बायकांना दररोज दारू पिऊन मारत असे. या मारहाणीला त्या कंटाळून गेल्या होत्या त्यामुळे अखेर त्यांनी त्याचा काटा काढायचं ठरवलं आणि तो झोपेत असतानाच त्याची हत्या केली. या हत्येने खळबळ उडाली असून पोलिसांनी त्या दोघांनाही अटक केलीय. त्यांना शुक्रवारी कोर्टात हजर केलं जाणार आहे. राजू वाघमारे (वय 32) असं त्या तरुणाचं नावं आहे. तो सुरक्षा रक्षकाचं काम करत असे. सविता आणि सरीता अशा त्याला दोन बायका होत्या. गोरेगावच्या शहीद भगतसिंग झोपडपट्टीत तो राहात असे.

देवेंद्र फडणवीसांना दणका, निवडणुकीच्या तोंडावर घेतलेल्या निर्णयांना स्थगिती

राजूला दोनही बायकांपासून चार मुलं होती. त्याला दारूचं व्यसन होतं. कामावरून आल्यानंतर तो दारू पिऊनच घरी येत असे आणि त्यांना मारहाण करत असे असं वृत्त टाईम्स ऑफ इंडियाने दिलं आहे.

या दोघींनीही त्याला अनेकदा समजावून पाहिलं मात्र तो ऐकत नव्हता. तुटपूंजा पगार, पदरी चार मुलं त्यामुळे संसार करताना प्रचंड ओढातान करत होत असे. त्यादोघीही घरकामं करून हातभार लावत होत्या. नवऱ्याच्या मारहाणीला त्या कंटाळून गेल्या आणि त्यांनी त्याचा काटा काढण्याचा निर्णय घेतला.

आता भाजपमध्ये आऊट गोईंग, हा मोठा नेता आहे शिवसेनेच्या रडावर

राजू झोपलेला असताना त्यांनी उशीने त्याचा गळा दाबून हत्या केली. राजूच्या भावाला ही घटना समजल्यानंतर त्याला संशय आला. त्याने पोलिसांना कळवलं. पोलिसांनी चौकशी केल्यानंतर त्या दोघींनी राजूच्या त्रासाला कंटाळून त्याची हत्या केल्याचं मान्य केलं.

Published by: Ajay Kautikwar
First published: December 5, 2019, 11:29 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading