ठाणे, 22 ऑगस्ट : सध्या चेन स्नॅचिंगच्या वाढत्या घटनांमुळे भिवंडीत सर्वसामान्य नागरिक हैराण झाले आहेत. त्यात आणखी एक याचप्रकारची घटना समोर आली आहे. दोन दुचाकीस्वारांनी एका वृद्ध महिलेच्या गळ्यातील सोन्याची चैन लांबवली. ही घटना अशोक नगरमध्ये घडली. चोरीच्या या घटनेची दृश्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
काय आहे संपूर्ण प्रकरण -
भिवंडीत सध्या चेन स्नॅचिंगच्या वाढत्या घटनांमुळे सर्वसामान्य नागरिक चांगलेच हैराण झाले आहेत, आता अशाच एका घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. अशोक नगरमध्ये ही घटना घडली आहे. दोन दुचाकीस्वार आले आणि त्यांनी एक सुनसान रस्त्यावर वृद्ध महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी खेचली आणि ते फरार झाले आहे. महिलेने त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र, ते दोन्ही पळून जाण्यात यशस्वी ठरले.
या घटनेच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहे की, एक वृद्ध महिला मंदिरात दर्शन घेतल्यानंतर तिच्या ओम साई इमारतीच्या खाली आली. मात्र, याचवेळी तेव्हा दुचाकीवर आलेल्या दोन दुचाकीस्वारांपैकी एकाने महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी खेचली आणि दुचाकीवरून पळ काढला. यानंतर ही महिला असहाय्यपणे त्यांच्या मागे धावत राहिली. मात्र, ते दोन्ही सोनसाखळी चोर तिथून पळून गेले.
भिवंडी पुन्हा एका चैन स्नेचिंग, मंदिरातून येणाऱ्या वृद्धेच्या गळ्यातील सोन्याची चैन लांबवली pic.twitter.com/MoYPuho9u5
— News18Lokmat (@News18lokmat) August 22, 2022
हेही वाचा - आधार कार्ड मागितलं मिळाली कानशीलात, महिला कर्मचाऱ्यासोबत अमानुष वागणुकीचा VIDEO व्हायरल
गेल्या काही दिवसांमध्ये याप्रकारच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. त्यामुळे येथील चोरांमध्ये कायदा आणि सुव्यवस्थेबाबत काहीच भीती राहिली नाहीए का, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे. तसेच नागरिकांनी मंदिरातून घरी जाताना आणि कुठेही बाहेर फिरताना सावध राहिले पाहिजे, असे या घटनेमुळे स्पष्ट होत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bhiwandi, Crime news