जामनगर, 16 मे : गुजरातच्या जामनगरमधून
(Jamnagar) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे ऑनर किलिंगच्या नावावर दोन जणांच्या हत्येने
(Two Murder in Jamnagar) खळबळ उडाली आहे. पहिल्या घटनेत आंतरजातीय विवाहाचा
(Family Oppose Intercast Marriage) राग आलेल्या मुलीच्या घरच्यांनी मुलाची हत्या केली. यानंतर थोड्याच वेळात मुलाच्या कुटुंबियांनी संतापाच्या भरात मुलीचा आईचा खून केला. या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. तर पोलिसांनी याप्रकरणी दोन्ही बाजूच्या आरोपींना ताब्यात घेतले आहे. त्यांची कसून चौकशी सुरू आहे.
नेमके काय घडले?
सोमराज नावाच्या 23 वर्षीय तरुणाने रुपलखा नावाच्या तरुणीसोबत आंतरजातीय विवाह केला होता. सोमराज हा जामनगरच्या हापा योगेश्वर परिसरातील रहिवासी होता. तर रुपलेखाही त्याच परिसरातील रहिवासी आहे. दोन्ही कुटुंबांचा या लग्नाला विरोध होता. मुलीचे नातेवाईकांचा विरोध इतक्या टोकाचा होता की, ते त्याची हत्या करण्यासाठी शोधत होते. याच दरम्यान, सोमराज राजकोट रोडवर अतुल शोरुम जवळ उभा आहे, अशी माहिती मुलीच्या नातेवाईकांना मिळाली. ते लगेचच तिथे पोहोचले.
यावेळी जेव्हा सोमराजने रुपलेखाच्या नातेवाईकांना पाहिले तेव्हा तो शोरुमच्या आत घुसला. मात्र, तरीसुद्ध तो स्वत:ला वाचवू शकला नाही. शस्र्तांसोबत आलेल्या रुपलेखाच्या नातेवाईकांनी शोरुममध्ये घुसून त्याची हत्या केली. सोमराजच्या हत्येनंतर त्याच्या नातेवाईकांनाही संताप अनावर झाला. संतापातच ते रुपलेखाच्या घरी पोहोचले. तिथे त्यांनी धमकावून तेथील मारेकऱ्यांची चौकशी केली. त्यावेळी मुलीची आई अनिता बाला घरात होती. यावेळी त्यांनी बदला घेण्याच्या भावनेत रुपलेखाच्या आईची हत्या केली.
हेही वाचा - वरातीसह पोलीस ठाण्यात पोहोचला नवरदेव; केली अशी मागणी की नवरीचे कुटुंबीयही शॉक
जामनगर पोलीस अधीक्षक काय म्हणाले?
जामनगरचे पोलीस अधीक्षक
(Jamnagar SP) प्रेमसुख डेलु यांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही घटनांचं मूळ प्रेम प्रकरण आहे. या लग्नामुळे त्यांच्या कुटुंबीयांना आनंद झाला नव्हता. याप्रकरणी, दोन्ही बाजूंच्या आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांची कसून चौकशी केली जात आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.