• Home
 • »
 • News
 • »
 • crime
 • »
 • संतापजनक! पोलिसांचा आंदोलनकर्त्यांवर गोळीबार; दोघांचा मृत्यू, संघर्षाचा थरकाप उडवणारा Live Video

संतापजनक! पोलिसांचा आंदोलनकर्त्यांवर गोळीबार; दोघांचा मृत्यू, संघर्षाचा थरकाप उडवणारा Live Video

पोलिसांनी आपल्याच नागरिकांवर अत्यंत क्रूरपणे गोळ्या चालवल्या.

 • Share this:
  आसाम, 23 सप्टेंबर : आसाममधील (Assam) दारांग (Darrang) जिल्ह्यात आज एका अतिक्रमण विरोधी अभियानदरम्यान पोलीस आणि स्थानिकांमध्ये भीषण संघर्ष (clashes between police and locals) झाला. धौलपुरमध्ये झालेल्या झडपेमध्ये 9 पोलीस कर्मचारी आणि 2 नागरिक जखमी झाल्याचं सांगितलं जात आहे. यादरम्यान पोलीस कर्मचारी गोळ्या झाडत असल्याचं दिसत आहे. घटनास्थळावरील या व्हिडीओमध्ये (Shocking Live Video) एक व्यक्ती आक्रमकपणे पोलीस कर्मचाऱ्यांच्या दिशेने येत असल्याचं दिसत आहे. त्यानंतर पोलीस कर्मचाऱ्यांनी त्याला मारहाण केली. या संघर्षात दोघांचा मृत्यू झाला असून 9 पोलीस कर्मचारी जखमी आहेत. (Two locals were killed in a police firing during an anti encroachment operation in Assam) दारांगचे पोलीस अधीक्षक यांनी एनडीटीवीशी बोलताना सांगितलं की, स्थानिकांनी अतिक्रमण विरोधी अभियानाचा विरोध केला आणि दगडफेक सुरू केली. एसपी सुशांत बिस्वा सरमा यांनी सांगितलं की, आमचे 9 पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. तर दोन नगरिक जखमी आहेत. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. हे ही वाचा-आता प्रत्येक भारतीयांना मिळणार युनिक हेल्थ ID, मोदी सरकारची नवी योजना सरमा यांनी सांगितलं की, उद्भवलेल्या परिस्थितीमुळे काम पूर्ण करता आलं नसल्याचं त्यांनी सांगितलं. या प्रकरणात तपास करण्यात येईल. सध्या सर्वजण परतले आहे. मात्र जेव्हा स्थानिकांना गोळी मारणे आणि मारहाण केल्याबद्दलच्या फुटेजबदद्ल विचारलं असता ते म्हणात्रे की, हा भाग खूप मोठा आहे. आम्ही दुसरीकडे होतो. घडलेल्या घटनेचा तपास करण्यात येईल, असं त्यांनी पुढे सांगितलं. सोमवारपासून या भागात तणावपूर्ण परिस्थिती आहे. गेल्या काही दिवसात 800 कुटुंबीयांना बेदखल करण्यात आलं आहे. या व्हिडीओवर तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. कायदा सुव्यवस्थेच्या नावाखाली स्थानिकांवर गोळ्या झाडणे कितपत योग्य आहे? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

  Published by:Meenal Gangurde
  First published: