मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /गुंडाराज! नवनिर्वाचित सरपंचाची दिवसाढवळ्या हत्या, हल्लेखोरांनी झाडल्या पाच गोळ्या

गुंडाराज! नवनिर्वाचित सरपंचाची दिवसाढवळ्या हत्या, हल्लेखोरांनी झाडल्या पाच गोळ्या

दुचाकीवरून आलेल्या हल्लेखोरांनी नवनिर्वाचित संरपंचांवर गोळ्या झाडून त्यांची हत्या केली. यामुळे गावात खळबळ उडाली असून घबराट पसरली आहे.

दुचाकीवरून आलेल्या हल्लेखोरांनी नवनिर्वाचित संरपंचांवर गोळ्या झाडून त्यांची हत्या केली. यामुळे गावात खळबळ उडाली असून घबराट पसरली आहे.

दुचाकीवरून आलेल्या हल्लेखोरांनी नवनिर्वाचित संरपंचांवर गोळ्या झाडून त्यांची हत्या केली. यामुळे गावात खळबळ उडाली असून घबराट पसरली आहे.

पटना, 14 डिसेंबर: ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत नुकत्याच (Local body election) निवडून आलेल्या संरपंचपदाच्या उमेदवाराची हत्या (Murder) झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. निवडणुकीतील वैमनस्यातून हा (Political rivalry) प्रकार घडल्याची चर्चा आहे. मतदानाच्या काळात निर्माण झालेलं राजकीय वैमनस्य आणि त्यानंतर आपल्या विरोधात लागलेले निवडणुकीचे निकाल यातून हा हल्ला झाल्याची प्राथमिक माहिती देण्यात येत आहे. भारतात राजकीय वैमनस्यातून हल्ले आणि हत्या होण्याच्या घटना नेहमीच घडत असतात. निवडणुकीच्या मैदानात पराभूत होऊ न शकणाऱ्या विरोधकाचा काटा काढण्याच्या घटना वारंवार पाहायला मिळतात. त्याचं प्रत्यंतर नुकत्याच घडलेल्या एका घटनेतून आलं आहे.

असा झाला हल्ला

बिहारमध्ये सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सुरू आहेत. फरीदपूर ग्रामपंचायतीत नीरज कुमार हे सरपंचपदाच्या निवडणुकीसाठी उभे होते. सलग दुसऱ्यांदा त्यांनी निवडणुकीत विजय मिळवला होता. नीरज कुमार यांच्या या विजयानंतर दोन बाईकस्वार त्यांच्या दिशेनं आले आणि त्यांच्यावर अंदाधुंद गोळीबार केला. या हल्ल्यात पाच गोळ्या लागल्याने नीरज कुमार गंभीर जखमी झाले आणि बेशुद्ध झाले. जखमी अवस्थेत त्यांना तातडीनं उपचारांसाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

प्रत्यक्षदर्शींनी दिली माहिती

नीरज कुमार यांची हत्या अत्यंत थंड डोक्याने करण्यात आल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली आहे. हल्लेखोर शांतपणे त्यांच्या बाईकवरून आले. त्यांनी नीरज कुमार यांच्यावर पाच गोळ्या झाडल्या. त्यानंतरही त्यांना तिथून निघून जाण्याची कुठलीही घाई नव्हती. हत्या केल्यानंतरही ते शांतपणे तिथून निघून गेल्याचं प्रत्यक्षदर्शी सांगतात.

हे वाचा- सौरऊर्जा आता रात्रीही वीज निर्माण करणार! नवीन तंत्रज्ञान विकसित

पोलीस तपास सुरू

पोलिसांनी अज्ञात व्यक्तींविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. ही हत्या कुणी केली, त्यामागचा उद्देश काय या प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा पोलीस प्रयत्न करत आहेत. मात्र दिवसाढवळ्या गावच्या संरपंचाचीच हत्या झाल्यामुळे गावात घबराट पसरली आहे.

First published:

Tags: Bihar, Crime, Murder, Police