मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

एका वधूचे दोन दावेदार, सनईच्या सुरात भिडले दोन गट, तुंबळ हाणामारीत लागलं लग्न

एका वधूचे दोन दावेदार, सनईच्या सुरात भिडले दोन गट, तुंबळ हाणामारीत लागलं लग्न

एकीकडे लग्न लागत होतं आणि दुसरीकडे काही मंडळी वधू ही आपली अगोदरपासून सून असल्याचा दावा करत होती.

एकीकडे लग्न लागत होतं आणि दुसरीकडे काही मंडळी वधू ही आपली अगोदरपासून सून असल्याचा दावा करत होती.

एकीकडे लग्न लागत होतं आणि दुसरीकडे काही मंडळी वधू ही आपली अगोदरपासून सून असल्याचा दावा करत होती.

  • Published by:  desk news

भोपाळ, 17 डिसेंबर: लग्नाच्या मंडपात (Marriage) वधुवरांचं (Bride and Groom) लग्नाचे फेरे सुरू असताना दुसरा गट (another group) तिथं आला आणि वधूचं अगोदरच लग्न झाल्याचा दावा करू लागला. त्यामुळं मंडपात चांगलाच गोंधळ उडाला. सुरुवातीला तोंडी वादापासून सुरू झालेला हा प्रकार हळूहळू हाणामारीपर्यंत (Fight) पोहोचला आणि लग्नाला अक्षरशः आखाड्याचं रुप आलं. ऐन लग्नात दुसरी पार्टी घुसल्यामुळे वराकडील मंडळी चांगलीच गोंधळून गेली.

काय आहे प्रकरण?

मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशच्या अखिलेश परिहार नावाच्या तरुणानं एका अल्पवयीन तरुणीसोबत पळून जाऊन लग्न केलं होतं. घरच्यांनी दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी दोघांना शोधून परत आणलं आणि अखिलेशवर अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर अखिलेशला या प्रकरणात न्यायालयानं तुरुंगवासाची शिक्षा सुनावली होती. तो तुरुंगातून सुटल्यानंतर पुन्हा असा प्रकार घडू नये, यासाठी मुलीच्या घरच्यांनी तिचं लग्न उरकरण्याचा निर्णय घेतला होता.

अखिलेशच्या कुटुंबाला लागली कुणकूण

आपल्या मुलानं ज्या मुलीसोबत पळून जाऊन लग्न केलं, त्या मुलीचं दुसऱ्याच मुलासोबत लग्न लावलं असल्याची कुणकूण अखिलेशच्या घरच्यांना लागली. त्याचा भाऊ, आई आणि इतर नातेवाईकांनी याबाबत मुलीच्या वडिलांना जाब विचारण्याचा निर्णय़ घेतला. मुलीचं लग्न सुरू असलेल्या ठिकाणी हे सर्वजण दाखल झाले आणि मुलीला भाभी, सून असा उल्लेख करून बोलावू लागले. ते पाहून नवऱ्या मुलाकडची मंडळी गोंधळात पडली, तर मुलीकडची मंडळी आक्रमक झाली.

वादावादीला सुरुवात

ऐन लग्नात हा प्रकार घडल्यानंतर मुलीच्या कुटुंबीयांनी आक्रमक पवित्रा घेतला आणि काही वेळातच हाणामारीला सुरुवात झाली. दोन्हीकडून एकमेकांना यथेच्छ बडवून काढलं जात होतं. याच गोंधळात सनईचे सूरदेखील वाजत होते आणि वधूवरांचे सात फेरेही पार पडत होते.

हे वाचा- बापरे! चक्क बिबट्यासोबतच फोटो काढायला गेला आणि...; सर्वात खतरनाक सेल्फीचा VIDEO

गोंधळातच उरकलं लग्न

या गोंधळातच वधूवरांचं लग्न पार पडलं. हे लग्न बेकायदेशीर असल्याचा दावा अखिलेशच्या कुटुंबीयांनी केला असून अखिलेश तुरुंगातून बाहेर आल्यानंतर याबाबत दाद मागणार असल्याचं म्हटलं आहे. तर अल्पवयीन मुलीला पळवून नेऊन केलेला विवाह हा कायदेशीर विवाह असू शकत नाही, असा पवित्रा मुलीच्या कुटुंबीयांनी घेतला आहे. पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.

First published:

Tags: Madhya pradesh, Marriage, Wife and husband