Home /News /crime /

कुल्लू-मनालीची ट्रिप जीवावर बेतली, पॅराग्लायडिंगदरम्यान दोघांचा दुर्देवी मृत्यू

कुल्लू-मनालीची ट्रिप जीवावर बेतली, पॅराग्लायडिंगदरम्यान दोघांचा दुर्देवी मृत्यू

यातील 21 वर्षीय पर्यटकाचा जागीच मृत्यू झाला.

  शिमला, 16 जून : सध्या मोठ्या प्रमाणात पर्यटक हिमाचल प्रदेशातील कुल्लू-मनालीसारख्या निसर्दरम्य ठिकाणी भेट देत आहे. त्याशिवाय या रिझनमध्ये देशातील विविध भागातून रायडर लेह-लडाखला भेट येतात. दरम्यान एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. या बातमीनंतर नागरिकांनी अधिक अलर्ट राहण्याची आवश्यकता आहे.

  हिमाचल प्रदेशातील (Himachal Pradesh Kullu) कुल्लू जिल्ह्यातील डोभी पॅराग्लायडिंग (Paragliding accident) साइटवर एक पॅराग्लाइड दुर्घटनाग्रस्त (Accident) झालं. ज्यात पर्यटकाचा जागीच मृत्यू झाला. तर रायडरने रुग्णालयात जीव सोडला. मृत पर्यटकाचं नाव आदित्य (21) हरयाणातील निवासी असल्याचं समोर आलं आहे. तर रायडर किशन गोपाल हा स्थानिक होता.

  हा अपघात बुधवारी दुपारी साधारण 12 वाजता घडला. डोभी पॅराग्लायडिंग साइडमध्ये डोंगरावरुन रायडरने पॅराग्लाइडवरुन पर्यटकाला घेऊन टेकअप करताच काही वेळानंतर पॅराग्लाइडमध्ये काही बिघाड झाला. ज्यामुळे पॅराग्लाइड खाली पडलं. यामुळे पर्यटकाचा जागीच मृत्यू झाला. यात रायडर किशन गोपालचा स्थानिक रुग्णालय कुल्लूमध्ये भरती केलं होतं. येथे काही वेळानंतर किशनने जागेवरच जीव सोडला.

  कुल्लू-मनालीला फिरायला आला होता आदित्य.. मृत आदित्य कुल्लू-मनालीचा सुंदर निसर्ग पाहण्यासाठी आला होता. यादरम्यान पॅराग्लायडिंगची इच्छा त्याच्या जीवावर बेतली. दुसरीकडे या घटनेनंतर पोलिसांना याबाबत माहिती देण्यात आली. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला आहे. पोस्टमार्टमनंतर मृतदेह कुटुंबीयांकडे सोपवण्यात येईल.

  Published by:Meenal Gangurde
  First published:

  Tags: Accident, Crime news, Himachal pradesh

  पुढील बातम्या