मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

सख्ख्या भावांकडून मुंबईत राहणाऱ्या बहिणीवर बलात्कार करून हत्या, आजीसोबतही अमानुष कृत्य

सख्ख्या भावांकडून मुंबईत राहणाऱ्या बहिणीवर बलात्कार करून हत्या, आजीसोबतही अमानुष कृत्य

वडिलांनी या प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल केली. त्यानंतर युवतीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे.

वडिलांनी या प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल केली. त्यानंतर युवतीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे.

वडिलांनी या प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल केली. त्यानंतर युवतीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Kranti Kanetkar

जबलपूर : रक्षाबंधनाला भावाने बहिणीचं रक्षण करायचं वचन द्यावं असं फार पूर्वीपासून म्हणायची पद्धत आहे. मात्र हा रक्षणकर्ताच भक्षक बनल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. दोन भावांनी मिळून १६ वर्षांच्या बहिणीवर बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. एवढ्यावरच ते थांबले नाहीत तर त्यांनी तिची हत्याही केली.

दोन भावांनी मिळून १६ वर्षांच्या बहिणीवर अत्यंत वाईट पद्धतीनं बलात्कार केला. ही युवती मुंबईहून खास रक्षाबंधनासाठी आपल्या आजीसोबत जबलपूरला आली होती. त्यावेळी हा धक्कादायक प्रकार घडला.

दोन भावांनी बलात्कारानंतर पीडित युवतीची हत्या केली. एवढ्यावरच ते थांबले नाहीत, त्यांनी आजीसोबतही जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. ही घटना समोर आल्यानंतर वडिलांच्या सांगण्यावरून पोलिसांनी युवतीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे.

प्रेमविवाह करून आणलेल्या पत्नीशी पतीचं धक्कादायक कृत्य, वाशिम हादरलं

पोलिसांनी या प्रकरणी एकाला अटक केली असून दुसऱ्या फरार आरोपीचा शोध सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार आजी आणि ही युवती १९ ऑगस्ट रोजी मुंबईहून जबलपूरला रक्षाबंधनासाठी गेले. जबलपूरमध्ये दोन्ही भावांनी मिळून १६ वर्षांच्या युवतीवर बलात्कार केला. त्यानंतर तिची हत्या केली. आजीवरही अत्याचार करण्याचा प्रयत्न केला.

पुण्यात उपचारादरम्यान कैद्याचा मृत्यू, रेल्वे पोलिसांच्या मारहाणीने जीव गेल्याचा नातेवाईकांचा आरोप

वडिलांनी या प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल केली. त्यानंतर युवतीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. तर फरार आरोपीचा पोलिसांकडून शोध सुरू आहे. या प्रकरणी एकाला अटक करण्यात आली असून त्याची कसून चौकशी केली जात आहे.

First published:

Tags: Crime news, Mumbai