Home /News /crime /

'मम्मी गेल्यामुळे पप्पा बेल्टाने खूप मारतात', दोन चिमुरड्यांना अमानुष मारहाण

'मम्मी गेल्यामुळे पप्पा बेल्टाने खूप मारतात', दोन चिमुरड्यांना अमानुष मारहाण

'मम्मी गेल्यानंतर सर्व राग आमच्यावर काढतात. कधी स्केल पट्टीने तर कधी बेल्टाने बेदम मारहाण करतात'

      नाशिक, 17 जानेवारी : आईच्या निधनामुळे पोरक्या झालेल्या मुलांना जन्मदात्या वडिलांनी अमानुष मारहाण केल्याची मन सुन्न करणारी घटना नाशिक (Nashik) जिल्ह्यातील इगतपुरीमध्ये (igatpuri) समोर आली आहे. या प्रकरणी पित्याविरोधात पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी इथं ही धक्कादायक घटना समोर आली आहे. राहुल मोरे असं या आरोपी पित्याचे नाव आहे. राहुल मोरे हा रेल्वे विभागामध्ये कार्यरत आहे. काही दिवसांपूर्वीच त्याच्या पत्नीचे निधन झाले होते. त्यांना एक मुलगा आणि मुलगी आहे. पत्नीच्या निधनानंतर राहुल मोरे हा सर्व राग आपल्या मुलांवर काढत होता. 'तुला परत मानलं रे ठाकूर', शार्दुलच्या बॅटिंगवर विराटची मराठमोळी प्रतिक्रिया राहुल मोरे हा कामावरून घरी आल्यानंतर मुलांना काठीने आणि बेल्टाने बेदम मारहाण करत होता. रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या मुलाने सांगितले की, 'पप्पा रोज आम्हाला मारहाण करतात. मम्मी गेल्यानंतर सर्व राग आमच्यावर काढतात. कधी स्केल पट्टीने तर कधी बेल्टाने बेदम मारहाण करतात' राहुल मोरे याने आपल्याच पोटच्या दोन लेकरांना अक्षरश: बेल्ट आणि काठीने बेदम मारहाण केली आहे. मुलांच्या अंगावर, पायावर आणि डोळ्यावर जखमेचे वर्ण दिसून येत आहे. मुलांना झालेली मारहाण पाहून रुग्णालयातील कर्मचारीही हळहळले होते. हे आहेत देशातील सर्वात स्वस्त फीचर फोन; 709 रुपयापासून किंमती सुरू पित्याच्या या क्रुरकृत्याची खबर इगतपुरी पोलिसांना मिळाली. इगतपुरी पोलिसांनी मुलांच्या मामा निलेश कंदारकर यांना फोन करून घटनेची माहिती दिली. 'तुमच्या पाव्हण्याने मुलांना अमानुष मारहाण केली. मुलांना घेऊन जा नाहीतर तो मारुन टाकेन' असं सांगितलं. त्यानंतर निलेश यांनी तातडीने इगतपुरीला दाखल झाले. त्यानंतर राहुल मोरे याला फोन करून मुलांना पोलीस स्टेशनला घेऊन येण्यास सांगितले. त्यानंतर मुलांना अमानुष मारहाण झाल्याचे समोर आले. निलेश यांनी तक्रार दाखल केल्यानंतर इगतपुरी पोलिसांनी राहुल मोरे यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला असून ताब्यात घेतले आहे. मुलांना झालेली मारहाण पाहून पोलीस सुद्धा हैराण झाले होते. मुलांना तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून उपचार सुरू आहे.

    तुमच्या शहरातून (महाराष्ट्र)

    Published by:sachin Salve
    First published:

    पुढील बातम्या