बाईकसाठी दोन भावांनी केली Facebook फ्रेंडची हत्या, बियरमधून दिलं विष

बाईकसाठी दोन भावांनी केली Facebook फ्रेंडची हत्या, बियरमधून दिलं विष

मित्रांनी भेटायला बोलावलं म्हणून तो गेला होता. पण त्याच मित्रांनी त्याचा घात केला. बियर ऑफर करत त्यातू त्याला विष दिलं आणि नंतर गळा घोटला.

  • Share this:

बरेली (उत्तरप्रदेश ) 11 नोव्हेंबर : वडिलांनी बाईक घेऊन दिली नाही म्हणून दोन भावांनी मिळून फेसबुकवरच्या मित्राची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडलीय. उत्तर प्रदेशातल्या बरेली इथली ही घटना असून त्याने सर्व जिल्ह्यात खळबळ माजलीय. दोन भावांनी वडिलांना बाईक घेऊन मागितली मात्र त्यांनी ती दिली नाही. त्यामुळे नाराज झालेल्या भावांनी अघोरी उपाय केला. सहा दिवसांपूर्वीच Facebookवर मित्र झालेल्या एका त्यांनी भेटायला बोलावलं. येताना बाईक घेऊन ये असंही त्यांनी त्याला सांगितलं. तो भेटायला आल्यावर त्या भावांनी त्या मित्राला बियर पाजली. त्यात त्यांनी विष मिसळलं होतं. विषारी बिअर घेतल्यावर तो बेशुद्ध पडला त्यानंतर त्याचा गळा दाबून त्यांनी त्याची हत्या केली.

सेक्स टॉक...इंजिनिअरचा न्यूड Video तयार करून तरुणीने केलं ब्लॅकमेल

तब्बल दीड महिन्यांनी  हे खळबळजनक प्रकरण उघडकीस आलं असून सगळ्यांनाच धक्का बसलाय. आरोपी भावांना पोलिसांनी अटक केली असून त्यांना फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी पीडीत मुलाच्या कुटुंबियांनी केलीय. पीडीत मुलाचे वडील हे मेडिकल कॉलेजमध्ये प्राध्यापक आहेत. त्यांनी मुलांना कॉलेजसाठी बाईक घेऊन दिली होती. त्याची आणि हत्या करणाऱ्या मित्रांची 6 दिवसांपूर्वीच मैत्री झाली होती. त्याच मैत्रीचा गैरफायदा घेऊन त्यांना त्याला भेटायला बोलावलं होतं.

लग्नाची तयारी सुरू असतानाच नवरदेवानं मंडपातच केली आत्महत्या

मित्रांनी भेटायला बोलावलं म्हणून तो गेला होता. पण त्याच मित्रांनी त्याचा घात केला. बियर ऑफर करत त्यातू त्याला विष दिलं आणि नंतर गळा घोटला. महिनाभर हे प्रकरण बाहेरच आलं नाही. पोलीस हत्येचा शोध घेत असताना त्यांनी संशयावरून बाईक पकडली आणि हत्येला उलगडा झाला. या दोघांना कडक शिक्षा व्हावी म्हणून पोलिसांनी प्रयत्न करावेत अशी मागणी पालकांनी केलीय.

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 12, 2019 11:51 PM IST

ताज्या बातम्या