भिवंडी, 17 ऑक्टोबर : भिवंडी शहरातील हनुमान टेकडी परिसरात देहविक्री करणाऱ्या 25 वर्षीय तरुणीची गुरुवारी रात्रीच्या सुमारास अज्ञात ग्राहकांनी तिच्या राहत्या घरात हत्या केल्याची घटना उघडकीस आली होती. या हत्येचा छडा लावण्यात भिवंडी शहर पोलिसांना चोवीस तासाच्या आत यश मिळाले आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोन सख्ख्या भावांना अटक केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे, या दोघांनी हत्येपूर्वी तरुणीवर बलात्कार केला. नंतर तिची गळा आवळून हत्या केली असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, 25 वर्षीय तरुणीची भिवंडीतील आसबीबी परिसरात असलेल्या हनुमान टेकडी या भागात राहून देहव्यापार करत होती. गुरुवारी रात्रीच्या सुमाराला या मृत तरुणीच्या खोलीत तीन ग्राहक आल्याची माहिती सांगण्यात आली. त्यामुळे या अज्ञात ग्राहकांवर तिच्या हत्येचा संशय व्यक्त करण्यात येत होता. आरोपींनी देहव्यापार करणाऱ्या या तरुणीच्या गुप्तांगास इजा पोहोचवून तिची गळा आवळून हत्या केल्याची माहिती समोर आली होती.
जळगावात सायबर टोळीचा पर्दाफाश; 412 कोटींच्या चोरीचा प्रयत्न, पत्रकाराला बेड्या
त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा 24 तासाच्या आताच छडा लावला आहे. पोलिसांनी तपासाची सूत्रे वेगाने फिरवत दोघांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता, ते दोघे आरोपी सख्खे भाऊ असल्याची माहिती समोर आली. तसंच यामधील मोठ्या भावाचे मृत तरुणीसोबत एकतर्फी प्रेम होते. ती त्याच्या प्रेमाला नकार देत होती. तर दुसरा आरोपी असलेल्या लहान भावाच्या पत्नीशी मृत तरुणीसोबत किरकोळ भांडण झाले होते. या दोन्ही वादातून या दोघा सख्ख्या भावांनी मिळून त्या तरुणीच्या राहत्या घरात प्रवेश केला. तिच्यावर बलात्कार करून तिला इजा केली आणि नंतर ओढणीने गळा आवळून तिची हत्या केल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली आहे.
अभिनेत्री कंगना रणौतविरोधात दाखल होणार FIR, वांद्रे दंडाधिकारी न्यायालयाचे आदेश
दरम्यान, दोघा भावांनी पोलिसांसमोर हत्येची कबुली दिल्याची माहिती भिवंडी झोनचे पोलीस उपायुक्त राजकुमार शिंदे यांनी दिली आहे. या दोन्ही आरोपींना अटक केली असून मृत तरुणी व दोन्ही आरोपी हे एकाच समाजाचे आहेत, तर याप्रकरणी पुढील कारवाई भिवंडी शहर पोलिसांची सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.
Published by:sachin Salve
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.