मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

ज्याच्या खांद्यावर खेळले त्याचंच झालं ओझं; नगरमधील 2 भावांनी जन्मदात्याला संपवलं

ज्याच्या खांद्यावर खेळले त्याचंच झालं ओझं; नगरमधील 2 भावांनी जन्मदात्याला संपवलं

मुलांना जगात जगण्याची कला शिकवण्याचा प्रयत्न करा. ऑफिसमध्ये बॉसने केलेला अपमान पचवून कशा प्रकारे काम करायचं हे त्यांना माहिती असायला हवं. म्हणजे त्यांना अपयश पचवण्याची आणि लढण्याची ताकद येईल.

मुलांना जगात जगण्याची कला शिकवण्याचा प्रयत्न करा. ऑफिसमध्ये बॉसने केलेला अपमान पचवून कशा प्रकारे काम करायचं हे त्यांना माहिती असायला हवं. म्हणजे त्यांना अपयश पचवण्याची आणि लढण्याची ताकद येईल.

Murder in Ahmednagar: अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर (Sangamner) याठिकाणी हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. येथील दोन भावांनी वडिलांना सांभाळायचा कंटाळा (After tired of taking care) आल्यानं त्यांची हत्या (Son killed father) केली आहे.

पुढे वाचा ...
  • Published by:  News18 Desk

अहमदनगर, 21 मे: अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर (Sangamner) याठिकाणी हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. येथील दोन भावांनी वडिलांना सांभाळायचा कंटाळा (After tired of taking care) आल्यानं त्यांची हत्या (Son killed father) केली आहे. वडील दररोज दारु पिऊन घरी येतात. भांडणं करतात. शिवाय वडिलांना दोन्ही डोळ्यांनी कमी दिसतं. या सर्व गोष्टींचा कंटाळा आल्यानं संगमनेर येथील दोन भावंडांनी आपल्या पित्याच्या डोक्यात वार करून खाली पाडलं आणि त्यानंतर गळा आवळून हत्या केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोन्ही भावांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पुढील तपास केला जात आहे.

दशरथ सुखदेव माळी असं हत्या झालेल्या वडिलांच नाव असून ते 60 वर्षांचे होते. त्यांना दारुचं व्यसन होतं. मृत दशरथ माळी बुधवारी नेहमी प्रमाणे दारु पिऊन घरी आले होते. यावेळी घरी आल्यानंतर आपल्या मुलांना शिवीगाळ करायला सुरुवात केली. याचा राग अनावर झाल्यानं दोन्ही मुलांनी बापाला मारहाण केली. त्यांच्या डोक्यात दांडक्यानं वार केला. त्यावेळी माळी खाली पडले. यानंतर दोन्ही भावांनी आपल्या वडिलांची गळा आवळून हत्या केली आहे. संबंधित आरोपी मुलांनी हत्येची कबुली दिली आहे.

गुरुवारी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात दोन्ही भावांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच हत्या करण्यासाठी मदत करणाऱ्या सुनेवर आणि मोठ्या भावाच्या एका अन्य मित्रावर देखील गुन्हा दाखल केला आहे.  रामदास दशरथ माळी (वय- 25) आणि अमोल दशरथ माळी (वय-18) असं आरोपी भावांची नावं आहेत. दोन्ही मुलं चिखली याठिकाणी वीटभट्टीवर मजूर म्हणून काम करतात. वडिलांच्या दारुमुळे त्यांच्या घरात नेहमीचं भांडणं व्हायची यातून बुधवारी रात्री त्यांची हत्या करण्यात आली आहे.

हे ही वाचा-पुण्यात खळबळ : 13 वर्षाच्या मुलाने जन्मदात्या पित्याची केली निर्घृण हत्या

या प्रकरणी तपास अधिकारी निकिता महाले यांनी सांगितलं की, आरोपी भावांनी वडिलांची हत्या केल्याची कबुली दिली आहे. त्यांनी बुधवारी वडील दारुच्या नशेत असताना त्यांच्या डोक्यात वार केला. यानंतर मृत माळी खाली पडले. यानंतर आरोपी भावंडांनी पित्याचा गळा आवळून त्यांची हत्या केली आहे.

First published:

Tags: Ahmednagar, Father, Murder