Home /News /crime /

भयंकर! सख्ख्या भावांनी घातलं मृत्यूचं तांडव, भाजप नेत्याच्या कुटुंबातल्या 7 जणांची निर्घृण हत्या

भयंकर! सख्ख्या भावांनी घातलं मृत्यूचं तांडव, भाजप नेत्याच्या कुटुंबातल्या 7 जणांची निर्घृण हत्या

हे भांडण एवढं टोकाला गेलं की त्या दोन भावांनी तलवारीने हल्ला करत घरातल्या 7 सदस्यांची हत्या केली. त्यात महिला आणि दोन मुलांचाही समावेश होता.

    भोपाळ 15 जुलै:  मध्य प्रदेशातलं (Madhy Pradesh) मंडला जिल्ह्यातलं मनरे गाव आज हादरुन गेलं. या गावात दोन सख्ख्या भावांनी मिळून आपल्या कुटुंबातल्या 7 जणांची हत्या केली. (Two brothers killed 7 members of their own family)  त्यात दोन चिमुकल्यांचाही समावेश आहे. कौटुंबिक वादातून हे दोन भाऊ साक्षात काळ बनून आले आणि त्यांनी प्रचंड हैदोस घातल आपल्याचं जिवलगांचा घात केला. या घटनेने सर्व जिल्हाच हादरून गेला आहे. मृतांची संख्या वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात असून अनेक जण जखमी झाले आहेत. ज्या कुटुंबातल्या सदस्यांची हत्या केली त्या कुटुंबाचे प्रमुख राजेंंद्र सोनी हे भाजपचे स्थानिक नेते होते. आरोपी हरीश आणि संतोष सोनी हे दोन भाऊ आहेत. त्यांनी राजेंद्र सोनी या नातेवाईक असलेल्या कुटुंबाचाच खात्मा केला. या दोन कुटुंबात गेल्या अनेक वर्षांपासून भांडण होतं. बुधवारी दुपारी हरीश आणि संतोष हे भाऊ तलवारी घेऊन राजेंद्र सोनी यांच्या घरी गेले. तिथे त्यांनी त्यांच्याशी भांडण केलं आणि  हे भांडण एवढं टोकाला गेलं की त्या दोन भावांनी तलवारीने हल्ला करत घरातल्या 7 सदस्यांची हत्या केली. त्यात महिला आणि दोन मुलांचाही समावेश होता. या हल्ल्यात राजेंद्र सोनी यांचं कुटुंबच संपून गेलं. घरात रक्ताचा सडा पडला होता. गावातले लोकच नाहीतर पोलिसही या घटनेने हादरून गेले आहेत. त्यानंतर गावतले लोकही जमा झाले त्यांनी त्या दोन भावांना झोडपून काढलं आता त्यांची प्रकृती गंभीर असल्याचं सांगितलं जाते. गावात पोलीस आल्यानंतर त्यांच्यावरही काही युवकांनी दगडफेक केली. या दोनही भावांचं लग्न झालेलं नाही आणि ते घरात एकटेच राहतात. गावात कायम भांडणं करणं आणि लोकांना त्रास देणं हेच त्यांच काम असल्याचं बोललं जातंय. या घटनेनं सगळं गावच सुन्न झालं असून पोलिसांनी गावात बंदोबस्त ठेवला आहे.
    Published by:Ajay Kautikwar
    First published:

    पुढील बातम्या