Home /News /crime /

ट्रॅव्हल एजंटला 300 रुपयांसाठी गमवावा लागला जीव; आरोपींनी 11 वेळा अंगावर कार घालून केली हत्या

ट्रॅव्हल एजंटला 300 रुपयांसाठी गमवावा लागला जीव; आरोपींनी 11 वेळा अंगावर कार घालून केली हत्या

केवळ 300 रुपयांसाठी एका ट्रॅव्हल एजंटचा (Travel Agent) निर्घृण खून (Brutal murder) करण्यात आला. नितीन शर्मा असं खून झालेल्या व्यक्तीचं नाव असून आरोपींनी तब्बल 11 वेळा त्याच्या अंगावर गाडी घातली.

नवी दिल्ली 08 डिसेंबर : लोकांमधील संवेदनशीलता नाहीशी होत असल्याच्या अनेक घटना आपल्या समोर येत असतात. कधी कुठे जवळचे नातेवाईकच एखाद्या व्यक्तीची हत्या करतात तर कधी क्षुल्लक रकमेच्या व्यवहारातून रक्ताचे पाट वाहतात. उत्तर प्रदेशातील ग्रेटर नोएडामध्ये (Greater Noida) अशीच एक घटना समोर आली आहे. ग्रेटर नोएडाजवळील घरबरा (Gharbara) या गावामध्ये केवळ 300 रुपयांसाठी एका ट्रॅव्हल एजंटचा (Travel Agent) निर्घृण खून (Brutal murder) करण्यात आला. नितीन शर्मा असं खून झालेल्या व्यक्तीचं नाव असून आरोपींनी तब्बल 11 वेळा त्याच्या अंगावर गाडी घातली. ट्रेनचं आरक्षण रद्द करताना 300 रुपये दंड घेतल्याच्या कारणावरून घरबरा गावातील दोन भावांनी नितीन शर्माचा खून केल्याचं समोर आलं आहे. झी न्यूजनं याबाबत वृत्त प्रसिद्ध केलं आहे. घरबरा गावात राहणाऱ्या नकुल आणि त्याचा भाऊ अरूण उर्फ छोटू या दोघांनी नितीनच्या अंगावर अकरावेळा गाडी घातली. या घटनेत जखमी झालेल्या नितीननं उपचारादम्यान जीव सोडला. पोलिसांनी या प्रकरणातील एक आरोपी नकुल (रा. घरबरा) याला अटक केली असून गुन्ह्यात वापरलेली स्विफ्ट कार जप्त केली आहे. फरार असलेल्या अरुणचा पोलीस शोध घेत आहेत, अशी माहिती ग्रेटर नोएडाचे अॅडिशनल डीसीपी विशाल पांडे (Additional DCP Vishal Pandey) यांनी दिली. डोळ्यादेखत प्रियकराने घेतला बाळाचा जीव; आई फक्त बघत राहिली मृत नितीन आपल्या कुटुंबासह घरबरा गावामध्ये राहत होता. तो एक मोबाइल दुकान चालवत होता आणि सोबतच ट्रेन तिकीट रिझर्वेशनचं (Train ticket reservation) कामही करत होता. साधारण एका आठवड्यापूर्वी गावातील नकुल आणि अरुण या दोन सख्ख्या भावांनी वैष्णवदेवीच्या दर्शनाला जाण्यासाठी ट्रेन तिकीट बुक करून घेतलं होतं. रविवारी रात्री दोघांनी नितीनकडून ट्रेनचं रिझर्वेशन रद्द केले. त्या बदल्यात नितीनने ऑनलाइन रिफंडमधून (Online Refund) 300 रुपये कापून घेतले. त्यामुळे संतापलेल्या दोन्ही भावांनी सोमवारी सकाळी नितीनचा शोध घेऊन कासना गावाजवळ त्याच्यावर प्राणघातक हल्ला केला. आरोपींनी नितीनजवळचे दोन मोबाईलही लुटले, अशी माहिती मृत नितीनचे वडील सतवीर शर्मा यांनी दिली. आरोपींच्या तावडीतून कसातरी सुटून नितीन दुचाकीवरून आपल्या घरबरा गावात पोहोचला. पाठलाग करत असताना आरोपींनी त्याच्या दुचाकीला कारनं धडक दिली, त्यामुळे नितीन 100 मीटर अंतरावर जाऊन पडला. त्यानंतर त्यांनी नितीनच्या अंगावर वारंवार कार घातली. हा सर्व प्रकार घडत असताना त्याठिकाणी अनेक लोकांनी गर्दी केली होती. मात्र, कुणीही नितीनला वाचवण्याचं धाडस दाखवलं नाही. शेवटी रस्त्यावरील बघ्यांनी जखमी नितीनला रुग्णालयात दाखल केलं. रुग्णालयातून पोलिसांना या प्रकरणाची माहिती मिळाली. लिफ्टच्या बहाण्याने कारमध्ये बसवलं, काही अंतर जाताच महिलेसोबत घडला भयावह प्रकार खूनाच्या घटनेमध्ये मृत्यू झालेल्या नितीनला दोन मुली आणि एक मुलगा आहे. त्याच्या मृत्युमुळे या तिन्ही मुलांच्या डोक्यावरून पित्याचं छत्र हरपलं आहे. या घटनेमुळे आसपासच्या परिसरामध्ये दहशत निर्माण झाली आहे.
First published:

Tags: Crime news, Murder news

पुढील बातम्या