• Home
 • »
 • News
 • »
 • crime
 • »
 • कोरोनावरील औषधांच्या नावाखाली दिल्या विषाच्या गोळ्या; उधारीपासून वाचण्यासाठी रचला हत्येचा डाव

कोरोनावरील औषधांच्या नावाखाली दिल्या विषाच्या गोळ्या; उधारीपासून वाचण्यासाठी रचला हत्येचा डाव

सावकाराकडून घेतलेलं कर्ज फेडायला लागू नये, यासाठी तमिळनाडूतील एकानं सावकार आणि त्याच्या कुटुंबियांच्या हत्येचा डाव रचला. मात्र पोलिसांनी अखेर हा प्रकार उघडकीला आणून आरोपीच्या मुस्क्या आवळल्या.

 • Share this:
  चेन्नई, 28 जून : सावकाराकडून घेतलेलं कर्ज (Loan) फेडता येत नसल्यामुळे आणि त्याच्याकडून येणारा दबाव दिवसेंदिवस वाढत चालल्यामुळे तमिळऩाडूत (Tamilnadu) एकानं गुन्हेगारी डाव (Conspiracy) रचत सावकाराच्या कुटुंबाचीच हत्या (Murder) केल्याचं उघड झालं आहे. सावकाराच्या पूर्ण कुटुंबाला (whole Family) कोरोनावरील औषध (Anti corona medicine) असल्याचं सांगत विषाच्या गोळ्या देण्यात आल्या. या घटनेत कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला असून पोलिसांनी दोन आरोपींना अटक (Two arrested) केली आहे. काय होतं प्रकरण? तमिळनाडूतील इरोड भागात राहणाऱ्या कल्याणसुंदरम (वय 43) यानं करुप्पनकुंदर (वय 72) यांच्याकडून 15 लाख रुपये उधार घेतले होते. हे कर्ज फेडता येत नसल्यामुळे आणि पैशांसाठी करुप्पनसुंदर यांच्याकडून सतत तगादा सुरु असल्याने हा विषय कायमचा संपवण्याचा निर्णय कल्याणसुंदरमनं घेतला. त्यासाठी या कुटुंबाची हत्या करण्याचा डाव त्याने आखला. या कुटुंबातील सर्व सदस्यांना कोरोनावरील औषध असल्याचं भासवून विषाच्या गोळ्या देण्याची योजना त्यानं अंमलात आणली. असा आखला डाव या योजनेसाठी त्यानं सबरी (वय 25) नावाच्या महिलेची मदत घेतली. आरोग्य कर्मचारी असल्याच्या बहाण्यानं 26 जून रोजी सबरी करुप्पनकुंदर यांच्या घरी गेली. सोबत पल्स ऑक्सिमीटर आणि तापमान मोजण्याचं यंत्र घेऊन घरी पोहोचलेल्या सबरीनं सर्वांची विचारपूस करून कोरोनाचा कुणाला त्रास आहे का, असं विचारलं. त्यांना कोरोनापासून बचाव करण्यासाठी काही औषधं देत असल्याचं सांगून विषाच्या गोळ्या दिल्या. या गोळ्यांचं सेवन केल्यामुळे कुटुंबातील चारपैकी तिघांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. कुरुप्पनकुंदर यांची पत्नी, मुलगी आणि घरकामाला असलेली बाई यांचा या घटनेत मृत्यू झाला, तर स्वतः कुरुप्पनकुंदर अत्यवस्थ आहेत. हे वाचा - पाकिस्तानी तरुणीचं जडलं भारतीयावर प्रेम; देशात प्रवेशासाठी थेट मोदींना विनंती असा लागला छडा पोलिसांना कुरुप्पनकुंदर यांनी जबानीनंतर त्यांनी सबरी आणि कल्याणसुंदरम यांची वेगवेगळी जबानी घेतली. त्यांच्या जबानीत परस्परविरोधी मुद्दे असल्याचं लक्षात आल्यानंतर त्यांनी दोघांना ताब्यात घेऊन चौकशी केली. पोलिसी खाक्या दाखवल्यानंतर दोघांनीही तोंड उघडलं आणि घडलेला सर्व प्रकार पोलिसांना सांगितला. दोघांना न्यायालयात हजर करण्यात आल्यानंतर त्यांना 15 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
  Published by:desk news
  First published: