Home /News /crime /

सोशल साइट्सवर स्वस्त सामान दाखवून फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, दोघांना अटक

सोशल साइट्सवर स्वस्त सामान दाखवून फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, दोघांना अटक

Cyber Crime: OLX सहीत इतर सोशल साइट्सवर (Social Sites) महागड्या वस्तू कमी पैशात विक्री करण्याचं नाटक करून त्यांनी अनेक लोकांना गंडा (Fraud) घातला आहे.

    जोधपूर, 22 डिसेंबर: लॉकडाऊन, कोरोना संक्रमण, संचारबंदी यामुळं लोकं घराच्या बाहेर पडणं कमी पसंद करत आहेत. त्यामुळं अलिकडच्या काळात लोकांमध्ये ऑनलाइन शॉपिंगची क्रेझ बरीच वाढली आहे. ऑनलाइन पद्धतीनं आवश्यक त्या गोष्टी खरेदी करणं, आता सामान्य झालं आहे. पण यामुळं देशात सायबर क्राइमचे प्रमाणही वाढलं आहे. ऑनलाइन शॉपिंग करताना वस्तू स्वस्त दिसली, तर लोकं अधिकाधिक रकमेच्या वस्तू खरेदी करतात, याचाच फायदा घेऊन काहीजण फसवणूक करत आहेत. शिवाय लोकांना मोहात पाडण्यासाठी स्वस्त वस्तूंचं अमिष देत आहेत. जोधपूरमध्ये असंच एक प्रकरण समोर आलं आहे. येथील दोन आरोपी 1000 रुपये किंमतीचं सामान 400 रुपयांना विकत असल्याचा दावा करत असंख्य ग्राहकांना फसवलं आहे. ऑनलाइन वस्तु खरेदी केल्यानंतर ग्राहकांना ना वस्तू मिळायची ना त्यांचे पैसे परत मिळायचे. OLX सहीत इतर सोशल मीडिया साइट्सवर महागड्या वस्तू कमी पैशात विक्री करण्याचं नाटक करून त्यांनी अनेक लोकांना गंडा घातला आहे. याप्रकरणी पोलिसांनी भरतपूर येथून दोन आरोपींना अटक केली आहे. कुडी पोलीस ठाण्याचे अधिकारी जुल्फिकार अली यांनी सांगितलं की, 5 जानेवारी रोजी कुडी येथील सेक्टर 8 मध्ये राहणाऱ्या हरजीतसिंग यांनी एक गुन्हा दाखल केला होता. त्यांनी आपल्या तक्रारीत सांगितलं की, या ऑनलाइन चोरट्यांनी हरजीतसिंग यांना 24000 रुपयांना एक दुचाकी विकली होती. पण दुचाकीचं ऑनलाइन पेमेंट केल्यानंतर त्यांनी सिमकार्ड बंद केलं आणि दुचाकीही दिली नाही. त्यानंतर फिर्यादीने दिलेल्या फोन नंबरच्या आधारे पोलिसांनी सायबर पथकाच्या मदतीने तपास केला आणि भरतपूर येथे राहणाऱ्या जफर आणि मौसम खान यांना अटक केली. हे दोघं सराईत गुन्हेगार आहेत. पोलिसांनी त्यांच्यावर प्रत्येकी पाच हजार रुपयांचं बक्षीसही जाहीर केलं होतं. पोलिसांनी सांगितलं, की दोघांच्या चौकशी दरम्यान अनेक ऑनलाइन फसवणुकीच्या घटना समोर येण्याची शक्यता आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Cyber crime, Online shopping

    पुढील बातम्या