Home /News /crime /

कोरोना लसीकरणासाठी जातानाच मृत्यूने गाठलं; 10 वीच्या 2 विद्यार्थ्यांचा जागेवरच मृत्यू

कोरोना लसीकरणासाठी जातानाच मृत्यूने गाठलं; 10 वीच्या 2 विद्यार्थ्यांचा जागेवरच मृत्यू

दहावीत शिकणाऱ्या या दोन मुलांचा जागेवरच मृत्यू झाला.

    रायपूर, 8 जानेवारी : छत्तीसगडमधील (Chhattisgarh News) जांजगीरमध्ये शनिवारी दुपारी रस्ते अपघातात (Road Accident) बाइकवर असलेल्या दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. दोन्ही विद्यार्थी लसीकरणासाठी (Corona Vaccination) जात होते. यादरम्यान जलद गतीने येणाऱ्या कारने त्यांना धडक दिली. या अपघातानंतर लोकांनी रस्त्यावर मुलांचा मृतदेह ठेवून चक्का जाम केला. (Two 10th graders died on the spot while going for corona vaccination) यानंतर लोक नुकसानभरपाईची मागणी करीत आहेत. पोलिसांनी हस्तक्षेप केल्यानंतर लोकांना साधारण दीड तासानंतर चक्का जाम मागे घेतला. कुटुंबीयांना 25 हजारांची तत्काळ मदत देण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बरभांठा गावातील (15) प्रसाद बरेठ आणि नीरज चौहान (15) दोघे छपोराच्या सेकेंडरी शाळेत दहावीच्या वर्गात शिकत होते. दोघेही लसीकरणासाठी बाइकवरुन छपोऱ्याच्या लसीकरण सेंटरमध्ये जात होते. तेव्हा जलद गतीने येणाऱ्या कारने त्यांना धडक दिली आणि कार फरार झाली. ही धडक इतकी भीषण होती की, दोघेही बाईकवरुन पडले आणि 30 मीटरपर्यंत फरफटत गेले. हे ही वाचा-'हे आई-बाबांना कळालं तर...';पालकांच्या भीतीने 10 वीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या या अपघातात दोन्ही मुलांच्या डोक्यावर जबर जखम झाली. तर एका मुलाचा पाय तुटला. दोघांचाही जागेवरच मृत्यू झाला. यानंतर परिसरात खळबळ उडाली. सूचना मिळताच पोलिसासहीत कुुटुंबीयही घटनास्थळी पोहोचले. त्यांनी भररस्त्यात मृतदेह ठेवून चक्का जाम केला. तब्बल दीड तासापर्यंत येथील वाहतूक विस्कळीत झाली होती.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Chattisgarh, Corona vaccination, Crime news, Road accident

    पुढील बातम्या