मुंबई 20 मार्च : कोरोनामुळे (Corona Pandemic) सध्या शाळाही घरातून सुरू आहेत. त्यामुळं मोबाईलवरच (Mobile) अभ्यासाचे व्हिडिओ, ऑनलाईन तास सुरू आहेत. यामुळं लहान मुलांच्या हातात सतत मोबाईल पाहायला मिळतात. याचे काही गंभीर परिणामही आता समोर येत आहेत. रायसिंहनगरमधील एका 12 वर्षांच्या मुलानं 6 वर्षांच्या मुलीबरोबर गैरकृत्य केल्याची घटना उघडकीस आली आहे. या मुलाला मोबाईलवर पॉर्न व्हिडीओ (Porn Video) बघण्याचं व्यसन लागलं होतं. त्यातूनच त्यानं हे कृत्य केल्याचं पोलीस चौकशीत समोर आलं आहे.
दैनिक भास्करनं दिलेल्या वृत्तानुसार, इयत्ता सहावीत शिकणारा हा मुलगा अभ्यासासाठी वडीलांचा मोबाईल वापरतो. ऑनलाइन अभ्यासादरम्यान एकदा चुकून त्याच्याकडून मोबाईलवर आलेली पॉर्न व्हिडिओची लिंक ओपन झाली. तेव्हापासून त्याला असे व्हिडिओ बघण्याची सवय लागली. यातूनच त्याबद्दल उत्सुकता वाढल्यानं त्यानं आपल्या सहा वर्षांच्या लांबच्या बहिणीसोबतच गैरकृत्य केलं.
देशात सध्या लहान मुलांमध्ये पॉर्न व्हिडिओ पाहण्याचे प्रमाण प्रचंड वाढत असल्याचं निदर्शनास आलं असून पालकांसाठी हा मोठा चिंतेचा विषय बनत आहे. नॅशनल सोसायटी फॉर प्रिव्हेन्शन ऑफ क्रुएल्टी टू चिल्ड्रेन (National Society for Prevention of Cruelty to Children) या संस्थेनं केलेल्या सर्वेक्षणातून धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. तब्बल 71 टक्के अल्पवयीन मुलं मोबाइल किंवा लॅपटॉपवर पॉर्न व्हिडीओ बघत असल्याचं स्पष्ट झालं असून, जवळपास 33 टक्के मुलांनी पहिल्यांदा मोबाईलवर तर 38 टक्के मुलांनी लॅपटॉपवर पॉर्न व्हिडीओ बघितले आहेत. 94 टक्के मुलांनी 14 वर्षांपेक्षाही कमी वयात पॉर्न व्हिडीओ पाहिले असून, 11 ते 16 वर्षे वयोगटातील 53 टक्के मुलांनी ऑनलाइन अश्लील फोटो, व्हिडीओ पाहिले आहेत. 14 टक्के मुलांनी स्वतःची अर्धनग्न, नग्न अवस्थेतील फोटो काढले असून 7 टक्के मुलांनी ते शेअरही केले आहेत. 42 टक्के मुलांनी फोटोत दिसतं त्याचप्रमाणे करण्याची इच्छा होत असल्याचं आणि सतत त्यांच्या मनात त्याबद्दल विचार येत असल्याचं मान्य केलं आहे. अनेक मुलांना पहिल्यांदा असे अश्लील फोटो, व्हिडीओ बघितल्यावर घाण वाटलं; पण दहापैकी चार मुलांना ते बघण्याची सवय लागली असल्याचंही स्पष्ट झालं आहे. दरम्यान, एका कार्टून चॅनेलनं केलेल्या सर्वेक्षणात भारतातील 96 टक्के घरांमध्ये मोबाइलचा प्रचंड वापर होतो. यामध्ये 73 टक्के घरांमध्ये मुलंच दररोज मोबाइलचा वापर करत असतात, असं निरीक्षण नोंदवण्यात आलं आहे.
यावर नियंत्रण कसे ठेवावे ?
मोबाईलवर मुलांना पोर्न व्हिडिओ पाहत असतील आणि पालकांच्या ते लक्षात येत नसेल तर याचा अर्थ मुलांना हिस्ट्री डिलीट करता येत असणार हे उघड आहे. त्यामुळं मुलांच्या अशा वागण्यावर नियंत्रण आणायचं असेल तर किड्स प्लेस-पेरेन्टल कंट्रोल अँड मॉनिटर, कन्व्हेनंट आय अशा काही विशेष अॅप्सच्या मदतीनं ते करता येईल. तसंच क्रोम ब्राउजरमधील सेटिंगमध्ये साईट सेटिंगवर कुकीज ऑप्शन ऑन केला तर सर्च हिस्ट्री डिलीट केली तरी फोनवरून कसल्या साईट्स पाहिल्या गेल्या आहेत हे कळेल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Covid-19, Crime, Crime news, Lockdown, Pandemic, Porn sites, Sexual harassment