स्मरणशक्ती वाढवण्यासाठी विद्यार्थ्यांना देत होता इंजेक्शन; शिक्षकाचं धक्कादायक कृत्य उघड

स्मरणशक्ती वाढवण्यासाठी विद्यार्थ्यांना देत होता इंजेक्शन; शिक्षकाचं धक्कादायक कृत्य उघड

एका शिकवणी घेणाऱ्या व्यक्तीनं आपल्या विद्यार्थ्यांसोबत अतिशय बेजबाबदार कृत्य केलं आहे. हा धक्कादायक प्रकार दिल्लीत उघडकीस आला आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 14 फेब्रुवारी : ज्ञानदानाचं काम हे अतिशय पवित्र असतं. विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यामध्ये आदर आणि विश्वास असतो. मात्र या विश्वासालाच तडा देणारं काम एका मुलांची शिकवणी घेणाऱ्या व्यक्तीनं (tutor) केलं आहे.

हा 20 वर्षीय व्यक्ती विद्यार्थ्यांच्या शिकवण्या घ्यायचा. त्यानं शिकवणीसाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांना नॉर्मल सलाईन सोल्युशन्स (normal saline solutions) इंजेक्शनच्या (Injections) माध्यमातून दिली. पोलिसांनी संदीप नावाच्या आरोपीला (accused) याप्रकरणात अटक केली. हा संदीप बीए द्वितीय वर्षाचा विद्यार्थी (BA Second Year student) आहे. तो विद्यार्थ्यांचे विनामूल्य क्लासेस घ्यायचा. पूर्व दिल्लीतील (East Delhi) मांडवली इथं हा प्रकार घडला.

पोलीस म्हणाले, हा प्रकार तेव्हा उजेडात आला, जेव्हा एका विद्यार्थ्यांच्या पालकानं त्याच्या पाल्याला हे इंजेक्शन घरात घेताना पाहिलं. तपासात समोर आलं, की या मुलांना एनएस अर्थात (नॉर्मल सलाईन) सोल्युशन्स ही शिकवणी घेणारी व्यक्ती देत असे.

संदीप म्हणाला, की त्यानं युट्युबवर (you tube) पाहिलं होतं, की मुलांची स्मरणशक्ती (memory) अशा एनएस सोल्युशन्स दिल्यानं वाढते. मांडवली पोलीस स्टेशनमध्ये एफआयआर दाखल करण्यात आली. आहे असं पूर्व दिल्लीचे डीसीपी संदीप यादव म्हणाले.

हेही वाचामारहाणीप्रकरणी खावी लागली जेलची हवा, बाहेर आल्यावर म्हणाला- Tiger is Back

आयपीसी 336 अंतर्गत (बेजबाबदार कृत्य करून मानवी आयुष्य धोक्यात टाकणं.) पोलीस म्हणाले, हा सगळा प्रकार तेव्हा उजेडात आला, जेव्हा एका पालकानं त्याच्या पाल्याला घरीच असं इंजेक्शन घेताना पाहिलं. आता बाकीच्या विद्यार्थ्यांचीही तपासणी केली जाते आहे. शिवाय याप्रकरणी अजूनही माहिती गोळा केली जाते आहे.

 

Published by: News18 Desk
First published: February 14, 2021, 9:41 PM IST

ताज्या बातम्या